दहशतीसाठी लावला फ्लेक्स; दोघांवर गुन्हा

दहशतीसाठी लावला फ्लेक्स; दोघांवर गुन्हा

भोसरी येथील फ्लेक्स पोलिसांनी हटविला

पिंपरी (प्रकाश इगवे) : महापालिका निवडणुकीनिमित्त शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे राजकीय पदाधिकाऱ्यांसह सराईत गुन्हेगारही ‘सक्रिय’ झाले आहेत. यातून एका सराईत गुन्हेगाराचे फ्लेक्स एकाने लावले. चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे सोमवारी (दि. (२१) हा प्रकार घडला. ही बाब निदर्शनास येताच पोलिसांनी फ्लेक्स हटवून दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. महेश डोंगरे (रा. भोसरी) आणि सुनील चव्हाण (रा. दिघी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस कर्मचारी दत्तात्रय बाळासाहेब कांबळे (४२) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. २२) भोसरी निवडणुकीनिमित्त शहरातील राजकीय पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश डोंगरे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याचे फ्लेक्स सुनील चव्हाण याने दहशत निर्माण व्हावी, यासाठी भोसरी परिसरातील मुरकुटे कॉर्नर, चक्रपाणी वसाहत येथे लावले. हे फलक लावण्यासाठी महेश डोंगरे आणि सुनील चव्हाण या दोघांनीही महापालिकेची अथवा पोलिसांची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. याबाबतची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी त्वरित ते फ्लेक्स हटविले आणि डोंगरे आणि चव्हाण या दोघांवर गुन्हा दाखल केला.

About The Author

error: Content is protected !!