डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती समितीच्या अध्यक्ष पदी महेंद्र ससाणे यांची निवड..!

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती समितीच्या अध्यक्ष पदी महेंद्र ससाणे यांची निवड..!

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समितीच्या अध्यक्षपदी युवक नेते महेंद्र ससाणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. येथील शासकीय विश्रामगृह येथे नूकतीच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते समाज बांधवांची व्यापक बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सूप्रीय बनसोडे हे होते. यावेळी आगळ्यावेळी स्वरूपात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार असून धम्मध्वजारोहन, भव्य मिरवणूक, भीम बूध्द गीतांचा बहारदार कार्यक्रम, रक्तदान शिबीर, व्याख्यानमाला, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आदी भरगच्च कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार असून या कार्यक्रमात सहभागी व्हावे असू अवाहन त्यांनी केले आहे. या वेळेस मून्ना कांबळे, उमाकांत बनसोडे, अजय बनसोडे,गौतम बनसोडे, विनय लामतूरे, अजिंक्य बनसोडे, शरद शिंदे, बालाजी आचार्य, आदित्य ससाणे,सुमित नवरंगे, अतीष कांबळे, बाबासाहेब वाघमारे, सिध्दार्थकुमार सूर्यवंशी आदींची पदाधीकारी म्हणून निवड करण्यात आली. याबैठकीला अरूणभाऊ वाघंबर,जीवनराव गायकवाड,एस.एम.ससाणे, गोपीनाथ जोंधळे, विशाल साबळे, सावन कदम, राहुल तलवार, दयानंद वाघमारे, माधव बनसोडे, गौतम गायकवाड, रवी लामतूरे, शरद लामतूरे,सचिन बानाटे, त्रिशरण वाघमारे, भिमराव कांबळे, अजय भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

About The Author