ब्रह्मानंद मुळे यांची भारताच्या टीम मध्ये निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचा शिस्त प्रिय खेळाडू ब्रम्हानंद देवानंद मुळे यांची आशिया कप हँडबॉल स्पर्धेसाठी भारताच्या टीम मध्ये नुकतिच निवड झाल्याने ब्रम्हानंद मुळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. लातूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवानंद मुळे यांची चिरंजीव ब्रम्हानंद चे प्राथमिक शिक्षण नूतन प्राथमिक शाळा अहमदपूर येथे झाले व माध्यमिक शिक्षण महात्मा फुले विद्यालयात झाले तो पाचवीपासून त्याला खेळाचे शिक्षण क्रिडा शिक्षक प्रा.सुनिल सुरकुटे सरांनी उत्तम रित्या शिकवले. आठवीत असताना तो नॅशनल स्टेटच्या दोन संघात खेळला. अकरावी आणि बारावी महात्मा गांधी महाविद्यालयात अभ्यासक्रम पूर्ण केला.बारावीला सायन्स घेऊन कॉलेजमधून तिसरा क्रमांक पटकावला होता. खेळाबरोबर शिक्षणात सुद्धा ब्रम्हानंद अग्रेसर राहिला.सध्या तो बी. ए . द्वितीय वर्षाला महात्मा गांधी महाविद्यालयातात असुन येथील क्रिडा शिक्षक प्रा. मनोज रेड्डी व महात्मा फुले विद्यालयाचे सुनील सूरकुटे, महेश उगिले यांचे बहुमूल्य मार्गदर्शन असल्यामुळेतो वयाच्या 19व्या वर्षीअशिया कप हँडबॉल भारताच्या टीम मध्ये तो दिनांक 22 ते 28 मार्च तेहरान इराण येथे खेळत आहे. पुढील वाटचालीसाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमित भैय्या देशमुख, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी मंत्री दिलीपराज देशमुख,भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, डॉ.पांडूरंग कदम, डॉ.वैभव रेड्डी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सांबजी महाजन, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अँड.हेमंत पाटील, माजी सभापती चंद्रकांत मद्दे, माजी उपसभापती कमलाकर पाटील,निळकंठ पाटील, अमित रेड्डी, गोविंद गिरी, रामभाऊ बेल्लाळे, राजकुमार खंदाडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास महाजन,प्रकाश ससाणे, यांच्या सह अहमदपुर तालुक्यातील व लातूर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तसेच क्रिडा प्रेमींनी ब्रम्हानंद देवानंद मुळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.