बाबासाहेब पाटील यांच्या मागणीला यश; युरिया, डीएपी खतांचा खरिपासाठी ‘बफर स्टॉक’
अहमदपूर (गोविंद काळे) : दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडच्या माध्यमातून युरिया, डीएपी खतांचा खरिपासाठी ‘बफर स्टॉक’ करण्याबाबत अहमदपूर-चाकुर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत कृषी आयुक्तांनी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळास ७० टक्के तर अन्य दोन संस्थांना १५ टक्के बफर स्टॉक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील रब्बी हंगामासाठी ५० हजार टन युरियाचा संरक्षित साठा करण्यात आला आहे.