सुनेगाव (शेंद्री) येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

सुनेगाव (शेंद्री) येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर तालुक्यातील सुनेगांव(शेंद्री) येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून सतत सात दिवस भागवताचार्य ह.भ.प श्रीकृष्ण महाराज दस्तापुरकर हे मार्गदर्शन करणार आहेत या सप्ताहात काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीपद् भागवत कथा, गाथाभजन, हरिपाठ, किर्तन, हरिजागर, असे दैनदिन धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. १३ एप्रिल रोजी ह.भ.प.मधुकर महाराज , सायाळकर १४ एप्रिल रोजी ह.भ.प.मुंजाजी महाराज बीडकर १५ एप्रिल रोजी ह.भ.प.सुर्यभान महाराज आवलगावकर १६ एप्रिल रोजी ह.भ.प.दिलीप महाराज मोळवणकर १७ एप्रिल रोजी ह.भ.प.त्र्यंबक महाराज दस्तापूरकर गुरुवर्य मोतीराम महाराज दस्तापूरकर यांचे नातू १८ एप्रिल रोजी ह.भ.प. दत्ता महाराज वागदरकर १९ एप्रिल रोजी ह.भ.प.विजयानंद महाराज , सुपेकर यांचे पुजेचे किर्तन दुपारी २ ते ४ व रात्री ९ ते ११ यांचे कीर्तन होणार असून २० एप्रिल रोजी रोजी ह.भ.प मधुकर महाराज सायाळ कर यांचे काल्याच्या किर्तनाने सांगता होणार आहे तसेच सात दिवस भजनी मंडळ आनंदवाडी, शेणी व शेंद्री गायनाचार्य अदिनाथ महाराज गुंडेवाडी , ज्ञानोबा माऊली गुंडेवाडी, प्रकाश महाराज, बाबुळगावकर, गणेश महाराज माळेगाव, श्रीकांत महाराज जालनेकर, विशाल केंद्रे आनंदवाडी मृदंगाचार्य गोविंद महाराज कांदे, माणिक महाराज सायाळकर, तुषार केंद्रे आनंदवाडी, विठ्ठल जायभाये हे उपस्थित राहणार आहेत तरी सुनेगाव (शेंद्री) व परिसरातील भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे अवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!