महेश अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री बाळासाहेब जाधव तर उपाध्यक्षपदी निवृतीराव कांबळे यांची बिनविरोध निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महेश को-ऑपरेटिव बँक लिमिटेड अहमदपूरच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांची तर उपाध्यक्षपदी निवृत्तीराव कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच महेश अर्बन बँकेच्या संचालकपदी बँकेचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक आमदार बाबासाहेब पाटील, शिवानंद हेंगणे, आशिष गुणाले, दिलीप जाधव, आशोक गादेवार, अब्दुल पटेल, सतीश कल्याणे, विनायक भोसले, नौनिहालसिंह जहागिरदार, पुरुषोत्तम पुरोहित, संगीता खंडागळे, सत्यकला जाधव, सुदर्शन मुंडे यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांची अध्यक्षपदी, तर निवृत्तीराव कांबळे यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच नवनिर्वाचित संचालक मंडळाचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक व्ही. व्ही. घुले हे होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जि.प सदस्य माधव जाधव, युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, व्यवस्थापक सिद्राम रंदाळे, प्रभारी व्यवस्थापक प्रशांत मांडवकर आदींची उपस्थिती होती.