ग्रामपंचायतीच्या शाश्वत विकासासाठी केंद्रेवाडी येथे ग्रामसभा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : संपूर्ण देशात केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतच्या शाश्वत विकासासाठी ग्रामसभा घेणे बंधनकारक होते या अनुषंगाने अहमदपूर तालुक्यातील मौजे केंद्रेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालया कडून मा .सभापती अयोध्याताई अशोकराव केंद्रे जि प सदस्य अशोक काका केंद्रे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतच्या शाश्वत विकासासाठी ग्रामसभा घेण्यात आली यावेळी सरपंच ज्योती माधव केंद्रे उपसरपंच ज्योती बालाजी केंद्रे ग्रामसेवक मोहन केंद्रे ग्रामपंचायत सदस्य इंद्रायणी भानुदास केंद्रे पुष्पा प्रकाश केंद्रे भानुदास रंगनाथ केंद्रे ज्ञानोबा भास्कर केंद्रे तुकाराम मनोहर केंद्रे उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते माधव केंद्रे आदर्श सेवानिवृत्त शिक्षक भानुदास गुरुजी केंद्रे बालाजी केंद्रे ग्रामपंचायत सेवक सुधाकर केंद्रे व समस्त गावकरी मंडळ केंद्रेवाडी यांच्या उपस्थितीत ही ग्रामसभा संपन्न झाली यावेळी गरिबीमुक्त आणि उपजीविका वरती पोषक गाव बनवणे आरोग्यदायी गाव समृद्ध गाव स्वच्छ आणि हरित गाव पायाभूत सुविधा युक्त स्वयंपूर्ण गाव सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव सुशासन मुक्त गाव लिंग समभाव पोषण गाव या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी गावकर यांनी उत्स्फूर्तपणे ग्रामसभेत भाग घेऊन विविध विषयावर चर्चा केली.