देशातील प्रत्येक राज्यात किसान मोर्चाच्या माध्यमातून शासनाच्या विविध कृषी योजनांची जनजागृती करणार – माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर
दिल्ली/ लातूर : गेल्या आठ वर्षांमध्ये मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारने शेतकर्यांसाठी आर्थिक प्रगती साधणार्या विविध योजनास मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतीमध्ये अनेक समाधानकारक बदल होत आहेत. काही ठिकाणी योजना शेतकर्यांपर्यंत पोहोचल्या नाहीत त्यामुळे योजनेचा लाभ शेतकर्यांना घेता आलेला नाही. त्यामुळे प्रत्येक राज्याच्या किसान मोर्चा प्रभारींनी 20 मे पर्यंत त्या-त्या राज्याच्या ठिकाणी मेळावे, बैठका घेऊन योजनांची माहिती किमान तीन दिवस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून देशातील प्रत्येक राज्यात शासनाच्या कृषी योजनांची जनजागृती करणार असल्याचे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले. यावेळी ते किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व राष्ट्रीय कार्यकारिणीच्या भाजपाच्या दिल्ली येथील कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष खा.राजकुमार चहर, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी डॉ. शंभूकुमारजी व सर्व राष्ट्रीय पदाधिकारी व राज्य राज्याचे प्रभारी उपस्थित होते. राज्यातील प्रभारींच्या कामाचा आढावा किसान मोर्चा राष्ट्रीय कार्यकारीच्या माध्यमातून आतापर्यंत झालेल्या शेतकरी हिताच्या अनेक योजना, त्याची झालेली अंमलबजावणी याबाबत प्रत्येक राज्यातील प्रभारींच्या कामाचा आढावा व पुढील दिशाही मांडण्यात आली असल्याचे माजी आ.कव्हेकरांनी यावेळी बैठकीत बोलताना सांगितले.