फुले महाविद्यालयात महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सतीश ससाने हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभागाचे प्रो. डॉ. अनिल मुंढे, हिंदी विभाग प्रमुख प्रो. डॉ. नागराज मुळे व कुु. कृतिका चिलगर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
