शिक्षकांनी भविष्यात सकारात्मक काम करावे – डी. बी. लोहारे गुरुजी यांचे प्रतिपादन

शिक्षकांनी भविष्यात सकारात्मक काम करावे - डी. बी. लोहारे गुरुजी यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षकांना समाजात अत्यंत मानसन्मानाने वागविले जाते त्यामुळे सेवानिवृत्तीच्या कालावधीमध्ये शिक्षकांनी जीवनात सकारात्मक काम करावे असे जाहीर आवाहन डि.बी. लोहारे यांनी केले. ते यशवंत विद्यालयांमध्ये सहशिक्षक डी बी जाधव यांच्या सेवानिवृत्ती बद्दल त्यांचा यशवंत परिवाराच्या वतीने सत्कार सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डी बी लोहारे गुरुजी .व्यासपीठावर प्राचार्य व्ही व्ही गपले,उपप्राचार्य बालाजी गोडभरले, उपमुख्याध्यापक रमाकांत कोडंलवाडे, पर्यवेक्षक दिलीप गुळवे ,सत्कारमूर्ती डी एम जाधव सौ माया जाधव, प्रतिक जाधव, धनश्री पाटील, कोटा पॅटर्न चे एस एम शेख सह मान्यवर उपस्थित होते. यावेळी यशवंत परिवाराच्यावतीने डी एम जाधव व माया जाधव यांचा संस्थेचे सचिव डी बी लोहारे गुरुजी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यासमयी सहशिक्षक रामलिंग तत्तापुरे, धनंजय तोकले,राजेश कज्जेवाड यांचे मनोगत पर भाषणे झाली प्रास्ताविक व्ही व्ही गंपले यांनी सूत्रसंचालन कपिल बिराजदार यांनी आभार गौरव चवंडा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत परिवाराने विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!