शहरात भगवान परशुराम व जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

शहरात भगवान परशुराम व जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अहमदपूर( गोविंद काळे ) शहरातील श्री संत चुडामणी महाराज मंदिरात भगवान परशुराम व जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी ह.भ.प.भरत शिरूरकर सर यांचे भगवान परशुराम, महात्मा बसवेश्वर यांच्या महान कार्यावर प्रकाश टाकणारे प्रवचन झाले, या प्रसंगी माजी मंत्री श्री विनायकराव पाटील साहेब, श्री. अमित रेड्डी, जुगलकिशोर शर्मा, अनंत काशीकर, मकरंद गुरू जोशी, नरहरी माळी धनंजय जोशी ,नितीनगुरु धर्माधिकारी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली या वेळी राजकुमार डांगे, गणेश हालसे, बापूराव शिरूरकर, विलास डांगे, अभय निलंगेकर, सुनील कुलकर्णी, संतोष सोलापूरे, राम जाधव, दत्ताभाऊ पाचंगे, अनिकेत काशीकर व शहरातील महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, या प्रसंगी शांती पाठाचे पठण गजानन जोशी यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!