नरेंद्र दाभोळकर यांना वैज्ञानिक दृष्टिकोन समजावण्यासाठी बलिदान द्यावे लागले – राज्य सचिव बाबासाहेब कांबळे
अहमदपूर (गोविंद काळे) : डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे विज्ञानाचे खास घेऊन चालणारे कार्यकर्ते होते. समाजामधील अनेक परंपरा रूढी ला फाटा देत .त्यांनी आपल्या जीवाचे बलिदान देऊन अंधश्रद्धा दूर करण्याचं काम त्यांनी केला आहे. असे प्रतिपादन रिपाईचे राज्य सचिव बाबासाहेब कांबळे यांनी यावेळी व्यक्त केले येथील शहीद डॉ नरेंद्र दाभोळकर विचार मंच या कार्यालयास येथील सामाजिक कार्यकर्ते व शहीद नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी एकत्र जेल भोगलेले रिपाईचे राज्य सचिव बाबासाहेबजी कांबळे, जनप्रबोधन आंदोलनाचे प्रणेते सुप्रियाभाऊ बनसोडे, अरुणभाऊ वाघबर, जीवन गायकवाड, अशोक सोनकांबळे, भगवान ससाने, राहुल तलवार अमोल गायकवाड यावेळी मेघराज गायकवाड यांनी अंनिसची भूमिका व गेली बत्तीस वर्षापासून चळवळीच्या कामाची पद्धत सांगण्यात आले. पुढे कांबळे बोलताना म्हणाले की मी औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांतर लढ्यामध्ये नरेंद्र दाभोळकर सोबत कारागृहामध्ये राहिलेला आहे. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा माझ्यावरही प्रभाव असून तालुका हा पुरोगामी विचाराचा तालुका असून या तालुक्यात गेले पंचवीस वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून ही चळवळ प्रत्येकाच्या घराघरात पोहोचण्याचा कामअंनिसचे कार्यकर्ते मोठ्या जोमाने काम करत आहेत . ही चळवळ म्हणजे प्रवाहाच्या विरोधात काम करणारी असून या चळवळीत गर्दी नसून दर्दी लोक आहेत .या कार्याची दखल घेत महाराष्ट्रातील साहित्यिक विचार वंत अनेक मान्यवर या अहमदपूर शहरांमध्ये उपस्थित राहून विविध कार्यक्रमाचे आयोजन व व्याख्याना व प्रबोधनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ कायम विविध उपक्रमाने सर्वांच्या संपर्कात राहून वैज्ञानिक दृष्टिकोन जास्तीत जास्त सामान्य व्यक्तीपर्यंत कसं जाईल येईल याकडे लक्ष दिले जात आहे या चळवळीच्या माध्यमातून अंधश्रद्धा मध्यमवर्गीय लोकापासून दूर करण्यासाठी सातत्याने सच्चे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. अशी भावना व्यक्त यावेळी वरील मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना संदीप गायकवाड यांनी केले तर आभार अशोक सोनकांबळे यांनी मानले.
