जिजाऊ ब्रिगेड आढावा बैठक

यवतमाळ (प्रतिनिधी) : जिजाऊ ब्रिगेड जिल्ह्याची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच झाली. बैठकीत ४ व ५ जून २०२२ रोजी पिंपळनेर (जिल्हा धुळे) येथे होऊ घातलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या पहिल्या राज्य ग्रामीण महाअधिवेशना संबंधी महत्त्वाचे नियोजन करण्यात आले. या अधिवेशनासाठी संपूर्ण राज्यात जोरदार तयारी सुरू आहे. यवतमाळ येथेही अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी या सभेचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा सीमा बोके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष कीर्तीमाला चौधरी, प्रदेश सहसचिव कांचन उल्हे, प्रदेश सदस्या शीला पाटील, जिल्हाध्यक्षा सरोज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेला ब्रिगेडचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. बैठकीत संघटन बांधणी, गाव तिथे शाखा, जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून महिलांना रोजगार, मुली व महिलांवर होत असलेले वाढते अत्याचार व त्यावरील उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. १४ मे रोजी अमरावती येथे होत असलेल्या जागतिक कीर्तीच्या बुधभूषणम् ग्रंथाचे प्रकाशन अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन झाले. बैठकीमध्ये जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून दक्षता डंभारे (सोमोसे) यांची नियुक्ती करण्यात आली. पुसद उपाध्यक्षपदी छाया लामणे यांची नियुक्ती करण्यात आली. बैठकीचे संचालन ब्रिगेडच्या जिल्हा कोषाध्यक्ष शीतल भोयर यांनी केले तर आभार संगीता राऊत यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!