चिकलठाणा सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पॅनलचा धुवा, मातब्बर पराभूत

चिकलठाणा सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पॅनलचा धुवा, मातब्बर पराभूत

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील चिकलठाणा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या झालेल्या अटीतटीच्या तिरंगी लढतीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली युवा शेतकरी विकास पॅनलने घवघवीत यश संपादन केले असून काँग्रेसच्या मातब्बर पुढाऱ्यांना पराभव पत्करावा लागला पंधरा वर्षापासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही सोसायटी आता भाजपच्या ताब्यात आली आहे.

चिखलठाणा सोसायटीच्या निवडणुकीत तिरंगी लढत झाली कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांनी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांच्या पदरी निराशाच आली या निवडणुकीत विकास कारखान्याच्या संचालकासह तब्बल चौदा वर्षे चेअरमन असलेल्या काँग्रेस पुढाऱ्याचा पराभव झाला आणि भाजपाचे नेते आमदार रमेश आप्पा कराड यांच्या नेतृत्वाखालील युवा शेतकरी विकास पॅनलने प्रचंड घवघवीत यश संपादन केले. निवडणुकीच्या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला.

चिकलठाणा येथील सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक प्रताप पाटील व्यंकोबा इंगळे शाहूराज भरबडे शिवाजी भरबडे नितीन जाधव लक्ष्मीबाई इंगळे सरस्वती जाधव मोतीराम पांचाळ शिवदत्त भारती तुळशिराम कांबळे विकास इंगळे यांचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी गुरुवारी सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उमेश इंगळे प्रवीण पाटील बाळासाहेब इंगळे विशाल जाधव प्रशांत पाटील राजा भाऊ जाधव चेतन भरबडे बालाजी भरबडे यांच्यासह अनेक जण होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!