शिवदास खंडागळे यांना अश्वगंधा वनस्पतीचे एकरी १ लाख २१ हजार रूपये विक्रमी उत्पन्न

शिवदास खंडागळे यांना अश्वगंधा वनस्पतीचे एकरी १ लाख २१ हजार रूपये विक्रमी उत्पन्न

सौ. अदिती अमित देशमुख यांनी केले अभिनंदन

लातूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मळवटी येथील शेतकरी शिवदास नारायण खंडागळे यांनी दीड एकर क्षेत्रावर अश्वगंधा वनस्पतीचे विक्रमी उत्पन्न काढले आहे, या अश्वगंधा आर्युवेदीक वनस्पतीला बाजारपेठेत प्रति कीलो २२० रूपये चांगला दर मिळाल्याने त्यांना एकरी १ लाख २१ हजार रूपयाचे उत्पादन झाले आहे. अश्वगंधा वनस्पतीचे उत्पादन यशस्वीपणे घेतल्या बददल ट्वेन्टीवन ॲग्री लि., च्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

लातूर तालुक्यासह जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी सेंद्रीय शेती आणि सुगंधी औषधी वनस्पती लागवड योजना ट्वेन्टीवन ॲग्री प्रा.लि.,ने आंतरराष्ट्रीय आयुर्वेदीक कंपनीच्या सोबत पुढाकार घेऊन राबवीली आहे. लातूर तालुक्यातील शेतकऱ्यासाठी सेद्रिंय शेती व सुगंधी वनस्पतीची शेती प्रायोगिक तत्वावर यशस्वी झाले नंतर अश्वगंधा लागवड योजना येथे राबविली जात आहे. ट्वेन्टीवन ॲग्री लि., कडून प्रारंभी सेद्रींय शेती आणि सुगंधी औषधी वनस्पती लागवड योजना लातूर तालुक्यातील महाराणा प्रताप नगर, मळवटी, महापूर, हरंगुळ बु., हरंगुळ खु., चिखुर्डा, आखरवाई, गातेगाव, मांजरी, सारोळा, कव्हा, जमालपूर येथील शेतकऱ्यांसाठी राबवली. या शेतकऱ्यांना ट्वेन्टीवन ॲग्री ली., चे सल्लागार धनजंय राऊत व कर्मचारी आणि आंतरराष्ट्रीय आयुर्वेदीक कंपनीचे तज्ज्ञ यांनी अश्वगंधा प्रक्षेत्रावर भेटी देऊन वेळोवळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले होते.

या योजनेतून मळवटी (ता.लातूर) येथील शेतकरी शिवदास नारायण खंडागळे यांनी अश्वगंधा वन्सपतीचे विक्रमी उत्पादन घेतले. त्यांनी दीड एकर क्षेत्रावर अश्वगंधा वनस्पतीची लागवड होती. लागवड, निगा व देखभाल, काढणी याकाळात त्यांनी शास्त्रीय पध्दतीने वनस्पती तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाने वनस्पती शेती केली. त्यांना दीड एकर क्षेत्रावर ८१३ किलो अश्वगंधाचे उत्पन्न झाले. या अश्वगंधा वनस्पतीला प्रति कीलो २२० रूपये कंपनीकडून दर मिळाला आहे. यातून त्यांना १ लाख ७८ हजार ८६० रूपये उत्पन्न झाले. साधारणपणे खर्च वजा जाता त्यांना एकरी १ लाख २१ हजार रूपयाचे विक्रमी उत्पन्न झाले.

अश्वगंधा ही आर्युवेदीक वनस्पती असून आर्युवेदीक औषधी उपयोगासाठी वनस्पतीची मागणी वाढली आहे. यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो असे सांगून अश्वगंधा वनस्पतीचे उत्पादन यशस्वीपणे घेतल्या बददल ट्वेन्टीवन ॲग्री प्रा. लि., च्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांनी शेतकरी शिवदास नारायण खंडागळे यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी ट्वेन्टीवन शुगर लि., चे व्हा. चेअरमन विजय देशमुख, संगिता मोळवणे, धनंजय राऊत यांनी वेळोवेळी अश्वगंधा शेतीस पाहणीसाठी भेटी दिल्या आहेत.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!