बामणी सोसायटीवर भाजपप्रणित 13 जणांची बिनविरोध निवड

बामणी सोसायटीवर भाजपप्रणित 13 जणांची बिनविरोध निवड

नूतन संचालकांचा आ रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील बामणी येथील सेवा सहकारी संस्था संचालकपदाच्या निवडणुकीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व 13 जणांची बिनविरोध निवड करण्यात आली असून नवनिर्वाचित संचालकांचा आ रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे, तालुका अध्यक्ष बन्‍सी भिसे, भाजयुमो तालुकाध्यक्ष अँड. धनराज शिंदे, संजय ठाकूर, राम बंडापल्ले, श्रीपाल गौरे, युनूस मुजावर, संतोष चिटकले यांच्यासह अनेक जण होते.

बामणी सोसायटीचे नूतन संचालकांत बालाजी बंडापल्ले, सौ श्यामाबाई चिते, सौ महानंदाबाई बोरसुने, संग्राम चेवले, याकूबसाब मुजावर, शिवाजी ताडमाडगे, नागनाथ जानवळकर, किशनराव ठाकुर, बालाजी देवकुळे, गोपाळ दिवटे, दिलीप बंडापल्ले, विनोद गवरे, निवृत्ती मांडे यांचा समावेश असून यासर्व नुतन संचालकांचा आ रमेशआप्पा कराड यांनी सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!