गैरसमज पसरवण्यांच्या प्रयत्नाकडे दुर्लक्ष करावे – ॲड. किरण जाधव

गैरसमज पसरवण्यांच्या प्रयत्नाकडे दुर्लक्ष करावे - ॲड. किरण जाधव

पिवळसर रंग काढून टाकण्यात यंत्रणेला यश

लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहर पाणीपुरवठयात पाण्याला नैर्सर्गीक कारणामुळे आलेला पिवळसर रंग काढून टाकण्यात यंत्रणेला यश आले असून एकूण व्यवस्था सुरळीत सुरू करण्यात आली आहे त्यामुळे या संदर्भाने विरोधी मंडळीकडून सुरू असलेल्या गैरसमज पसरवण्यांच्या प्रयत्नाकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी केले आहे.

या संदर्भाने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी म्हटले आहे की, लातूर शहरात नळाव्दारे पिवळया रंगाच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. लातूर येथील भेटी दरम्यान या संदर्भाने लातूर शहर महानगरपालीका पदाधिकारी व प्रशासन यांची संयुक्त बैठक घेवुन पालकमंत्री आदरणीय ना. अमित विलासराव देशमुख यांनी पाणी पुरवठा सुरळीत करणे बाबत सुचना केली होती. नळाव्दारे पुरवठा होणाऱ्या पाण्यास पिवळसर रंग येण्या मागे कारणाचा शोध घेण्यात आला आहे. पाण्यातील शेवाळयावर कडक उन्हाची किरणे पडल्यामुळे रासायनीक प्रक्रीया होवून पाणचा रंग बदलत असल्याचे यावेळी तज्ज्ञ मंडळीनी सांगितले. तज्ज्ञ मंडळीनी रंग बदलत असले तरी पाणी पिण्या योग्य असल्याचे तज्ज्ञ मंडळीनी सांगितले होते. पाणी पिण्या योग्य असले तरी जनतेतील भिंती दूर व्हावी म्हणून पाण्याचा रंग सामान्य करण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश सदरील बैठकी दरम्यान दिले होते. लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, आयुक्त अमन मित्तल आणि महानगरपालीका यंत्रणेने अथक परिश्रम घेऊन पाणीपुरवठा सुरळीत केला आहे, पाण्याचा रंग हे सामान्य झाला आहे एकूण समस्या सोडवण्यात आता यशही आले आहे.

पाण्यात रंग मिसळून विरोधकांचे आंदोलन निषेधार्य बाब

महानगर पालीकेच्या यंत्रणेने अहोरात्र परिश्रम घेउन पाणी पुरवठयात सुधारण घडवून आणली. पाण्याचा पिवळा रंग घालवण्यारसाठी प्रयत्न करून पाणी पुरवठा सुरळीत केला असतांना विरोधी मंडळीनी जनतेत गैरसमज पसवण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊन्‍ प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. पाण्यात पिवळा रंग मिसळून विरोधकांनी आंदोलन केल्याचे निर्दशनास आले आहे. विरोधकांचे हे आंदोलन म्हणजे जनतेचा विश्वासधातच आहे त्यामूळे निवडणूक डोळया समोर ठेवून असे आंदोलन करणे हे निषेधार्य बाब आहे असे लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी म्हटले आहे.

About The Author

error: Content is protected !!