अशा राजकारणात कोण कोणावर भारी ? किरकोळ कारणावरून आघाडीतील तुटेल का यारी ??

अशा राजकारणात कोण कोणावर भारी ? किरकोळ कारणावरून आघाडीतील तुटेल का यारी ??

उदगीर (प्रतिनिधी) : उदगिर विधानसभा मतदारसंघात गेल्या कित्तेक दिवसापासून काँग्रेस पक्षाला स्वबळाची नशा चढली आहे. वास्तविक पाहता स्थानिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी ही गोष्ट चुकीची आहे, हे वरिष्ठ नेत्यांना दाखवून देण्याचा केविलवाणाा प्रयत्न केला आहे.तो केविलवाणा प्रयत्न केला असलातरी त्याला कोणी फारसी किंमत कोणि देत नाही.अनेकांनी अनेक वेळात पालकमंत्र्यांच्या आदेशाला कोलदांडा घालून ग्राम पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सरळ सरळ स्थानिक पातळीवर आघाडी करत नेत्यांच्या आदेशाला झुगारून दिले आहे. यदाकदाचित नेत्यांचा आदेश स्थानिक कार्यकर्त्यांनी पाळला असता तर काँग्रेस पक्ष रसातळाला गेला असता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
विद्यमान स्थितीत राजकीय भाषेत बोलायचे झाल्यास, नाक कापले तरी…… म्हणतात तशी अवस्था निर्माण झाली आहे!काॅंग्रेस या राष्ट्रीय पक्षाची सध्या मोठी गोची सुरू आहे!वरकरणी जिल्ह्यात आमचे सदस्य जास्त! असे म्हणून आपलं नुकसान कांहीच झाल नाही,असे भासवले जाते आहे.अर्थात हा भास कीती लोकोंना पटवता येतो हाही संशोधनाचा विषय बनत चालला आहे!कांही कार्यकर्ते पक्षाची प्रतिमा उजळून काढण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात,पक्ष प्रतिमा ऊजळण्याच्याप्रयत्नात भरून घेण्यात धन्यता मानू लागले आहेत!!
भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या जळकोट तालुक्यात राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आपल्या कर्तृत्वावर काँग्रेसच्या बरोबरीने जागा जिंकून आपले वर्चस्व सिध्द केले आहे!विशेष म्हणजे पक्षिय बलाबलीच्या नावावर कमी जागा दिल्या!तरीही आघाडिचा धर्म पाळत इतर पक्षाच्या जागा जिंकून आपली लोकप्रियता दाखवून दिली आहे.

वास्तविक जागा मर्यादित दिलेल्या असतांना आघाडीच्या धर्माचा प्रामाणिक प्रयत्न करून विजयश्री मध्ये कमी पडले नाहीत !हे त्यांचे उल्लेखनीय काम आहे!! त्याच बरोबर प्रत्यक्ष त्यांचा मतदारसंघाचा भाग नसतांना लोकप्रियतेच्या जोरावर मतदार संघात प्रभाग नसतानादेखील देवनी मध्ये देखील काँग्रेसचा झेंडा फडकवावा म्हणून नामदार संजय बनसोडे यांनी केलेले प्रयत्न दुर्लक्ष करता येत नाहीत!!!
त्यांची तळमळ,पक्षनिष्ठा ही काळया दगडावरची रेघ आहे.
मग तुम्ही काय जिंकलात? शिरूर आनंतपाळ तर एखहाती भारतीय जनता पक्षाच्या हाती गेले !!,ज्या चाकूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एकाच घरातून तीन-तीन उमेदवाराचे भाषा वापरली होती,त्या ठिकाणच्या उमेदवारांनी आणि मतदारांनी काॅंग्रेसला लोकासांगे ब्रम्हज्ञान,आपण कोरडे पाषाण असल्याचा प्रत्येय आणूण दिला!!ज्या देशमुख घराणातून वेगवेगळ्या जागेसाठी अनेक उमेदवार थांबतात,निवडणुक लढतात,मग त्या वेळी या गोष्टीची आठवण देशमुखांना का झाली नसेल?याचीही गंमतशिर चर्चा क्कित्तेक दिवस प्रभागात चालू होती म्हणे!!!
चाकूरात काँग्रेसला तोंडघशी पडावे लागले ,ही लाजिरवाणी अवस्था कशामुळे घडली?? याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे .अन्यथा मग येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये चाकूर ची पुनरावृत्ती झाली तर नवल वाटू नये ! राजकीय पक्षात कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींचे काही चुकत असेल किंवा धोरण, उद्दिष्टांना सोडून जात असे तर स्पष्टपणे सांगण्याची हिंमत इतर पक्षातील कार्यकर्ते बिनधास्तपणे,मोठ्या ,, करतात मात्र देशमुख यांना सांगणार कोण हा मोठा प्रश्न निर्माण झाल्यामुळे भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था कार्यकर्त्यांचे झाली आहे पराभव झाला तर झाला देशमुखांची नाराजी नको अशा दुर्दैवी चक्रव्यूहात कार्यकर्ते अडकले आहे उदगीर सारख्या छोट्याशा नगरपालिकेच्या निवडणुकीत राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रभावामुळे इच्छुक असलेले नगरसेवक आ जी नगरसेवक माजी नगरसेवक आणि इतरही अनेक इच्छुक कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत आहेत आता हा प्रवेश रोखण्यासाठी कारण सांगण्यात येत आहे की पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना विकास निधी द्यायचा नाही असे ठरवून कामकाज सुरू केले आहे परिणामतः काही कार्यकर्त्यांनी यासंदर्भात आम्ही देशमुख यांना स्पष्ट कल्पना देऊन राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीच्या वाट्याला द्यावा अशी मागणी केली असल्याची चर्चा आहे एकंदरीत खरे काय खोटे काय माहित नाही मात्र या चर्चेमुळे अमित देशमुख यांनी काँग्रेसच्या एका नेत्याला खडक सावल्यांचे कळते त्यामुळे त्याने त्याने वैतागून आपली चहाडी करणाऱ्या त्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे अस्तित्व संपवण्याची भाषा केल्याची चर्चा सध्या समाज माध्यमावर रंगत आहे केल्या निवडणुकीचा विचार केल्यास जनतेतून झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नव्याने समजल्या जाणाऱ्या एम आय एम या राजकीय पक्षांना उदगीर करांना सळो कि पळो करून सोडले होते आजही जर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाळी झाली तर तत्कालीन एम आय एम आमचे नेते आणि आजचे राष्ट्रवादीचे राज्य मंत्र्याचे जवळचे समजले जाणारे कार्यकर्ते ताहेर हुसेन हे यांना राज्यमंत्र्यांनी ताकद दिल्यास ते वरचढ ठरणार नाहीत ना अशी ही शक्यता वर्तविली जात आहे समाज माध्यमांसमोर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ताहेर घुसेल यांनी स्पष्ट केले की आपण केवळ गुत्तेदारी प्रक्रियेमध्ये सर्व राजकीय पक्षांना बरोबर अधिकार द्यावा अशी मागणी पालक मधल्या कडे केली होती पालकमंत्र्यांनी त्याला आधार धरून सर्व राजकीय पक्षांना समान निधीही वाटप केला होता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निधी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ती वाढेल त्याचा परिणाम येणाऱ्या स्वराज्य संस्थांनी वर होईल अशी भीती कॉग्रेसच्या लोकांनी व्यक्त करून पालकमंत्र्याकडून निधी रद्द करून घेतला आणि त्याचे पुनर वाटप करण्यात आले वास्तविक पाहता हे अत्यंत चुकीचे आणि घाणेरडे आहे राजकारणाला न शोभणारी आहे अशीही टीका ताहेर हुसेन यांनी केली आहे विद्यमान घडीला माजी नगराध्यक्ष राजेश्वरराव निटूरे यांनी केली आहे विद्यमान घडीला माजी नगराध्यक्ष राजेश्वरराव निटूरे आणि माजी नगरसेवक ताहेर हुसेन यांच्यातील हे वादळ तेल यातील वादळ ठरेल की पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीला न पेलणारे ठरेल याबाबत उदगीर शहरात शंका-कुशंका व्यक्त करण्यात येत आहे सद्यस्थितीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीने स्वतंत्र निवडणुका झाल्यास काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने जातीची समीकरणे घालत प्राधान्यक्रमाने लिंगायत समाजाला संधी दिली जाईल गेल्या निवडणुकात राज पाटील नागराळकर यांनी राजेश्वर निटूरे यांच्याविरोधात केलेले खालच्या पातळीवरील आरोप आज ही जनता विसरलेली नाही कित्येक जण ते विसरले नाहीत विसरणे शक्यही नाही त्यामुळे पुन्हा ये रे माझ्या मागल्या कालच्या ताक कण्या चांगल्या म्हणण्याची वेळ राजकर्त्या वर येऊ नये असे वाटते वास्तविक पाहता प्रेमाने राजकारणात सर्व काही माफ असते असे म्हणतात त्याचे उदाहरण तत्कालीन नेते चंद्रशेखर भोसले यांनी माजी नगराध्यक्ष तथा बसवराज पाटील नागराळकर यांना एकत्र बसून करून दाखवले होते वास्तविक पाहता राजकारणामध्ये व्यक्तिगत पातळीवर केले गेलेले आरोप हे सहजासहजी विसरले जात नाही ते विसरले जावेत म्हणून दिले जाणारी डीज दिले जात असले तरी त्या तळ्यांची ओळख आणि डाग कधीच विसरू शकत नाही नाही त्यामुळे येणारी निवडणूक हे अत्यंत महत्त्वाचे असून देखील कार्यकर्त्यांच्या पोर खेळत महा विकास आघाडी ला जर धोका झाला तर भारतीय जनता पक्ष या संधीची वाट पाहत आहे हे विसरून चालणार नाही.

About The Author