जातीचे वैधता प्रमाणपत्र 17 जानेवारी 2023 पर्यंत सादर करावे

जातीचे वैधता प्रमाणपत्र 17 जानेवारी 2023 पर्यंत सादर करावे

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील माहे जानेवारी 2021 मध्‍ये झालेल्‍या ग्रामपंचायतीच्‍या निवडणुकांबाबत राखीव प्रवर्गातुन निवडून आलेल्‍या उमेदवारांनी पडताळणी समितीकडून दिलेले जातीचे वैधता प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्यास सादर करण्‍याचा अंतिम दि. 17 जानेवारी 2023 असल्याचे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

ग्रामविकास विभाग, महाराष्‍ट्र शासन यांच्या परिपत्रकान्‍वये माहे जानेवारी 2021 मध्‍ये झालेल्‍या ग्रामपंचायतीच्‍या निवडणुकांबाबत राखीव प्रवर्गातुन निवडुन आलेल्‍या उमेदवारांनी पडताळणी समितीकडुन दिलेले जातीचे वैधता प्रमाणपत्र सक्षम अधिका-यास सादर करण्‍याचा अंमित दि.17 जानेवारी 2023 असा असल्‍याचे पत्रकात नमुद केले आहे.

About The Author