छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवशाही प्रतिष्ठाण च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवशाही प्रतिष्ठाण च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन

लातूर (प्रतिनिधी) : शिवशाही प्रतिष्ठाण आयोजित दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. या वर्षी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल इतिहास पोवाड्याच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहंचावा या उद्देशाने शिवशाही प्रतिष्ठाणने प्रसिद्ध युवा शिवशाहीर यशवंत जाधव संभाजीनगर औरंगाबाद तसेच मुंबई येथील सहकलाकार यांना निमंत्रीत केले आहे. यांच्या बहारदार पोवाड्याचे सादरीकरण होणार आहे. दि. १४ मे २०२२ रोजी वार शनिवार सायं. ठिक ६ वा. दयानंद कॉलेज, शिवशाही प्रतिष्ठाण कार्यालय समोर, लातूर येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात येणार आहे. तरी जास्तीतजास्त संख्येने शिवप्रेमींनी उपस्थित राहून या बहारदार पोवाड्याचा आनंद घ्यावा असे आवाहन शिवशाही प्रतिष्ठाण लातूरच्या वतीने करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवशाही प्रतिष्ठाण च्या वतीने सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन दि १४ मे २०२२ रोजी वार शनिवार सकाळी १० ते १ पर्यंत दयानंद कॉलेज शिवशाही प्रतिष्ठाण कार्यालयासमोर लातूर येथे होणार आहे. या सर्वरोग निदान शिबीरात सहभागी होणाऱ्या रुग्णांना एक्सरे, सोनोग्राफी, रक्ततपासणी यामध्ये ५०% सवलत, रुग्णांना लागणाऱ्या औषधावर १०% सवलत व हॉस्पिटलमधील उपलब्ध औषधे मोफत मिळणार आहेत. तरी शिबीरामध्ये अॅडमिट होणाऱ्या रुग्णांच्या बिलावर ४०% सवलत देण्यात येणार असल्याचे आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रमोद घुगे एम. डी. मेडीसिन, डॉ. प्रतिभा घुगे सी. एम. बी. बी. एस.डी.एम.आर.ई., डॉ. मनोजकुमार भड के एम. बी. बी. एस. डी. एन. बी., डॉ. योगिनी थोरात एम. बी. बी. एस. एफ. सी. पी. एस. या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्वरोग निदान शिबीर आयोजित केले आहे. तरी जास्तीतजास्त संख्येने रुग्णांनी सहभागी होऊन या सर्वरोग निदान शिबीराचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. प्रमोद घुगे व शिवशाही प्रतिष्ठाणने केले आहे.

About The Author