राज्य शासनाने घेतली भरत पवार याच्या कार्याची दखल
लातूर (प्रतिनिधी) : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या स्वातंत्र्य वीरांनी, सैनिकांनी, योद्ध्यांनी, भारत मातेच्या चरणी प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळवून दिले. आणि त्या सर्व शुरविरांची शौर्य गाथाही सुवर्णाक्षरात लिहिली गेली.
कोविड च्या काळामध्ये ज्या योद्ध्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून समाज व राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून कोरोना महामारी विरुद्ध लढा दिला. आणि भारताला कोरोना पासून मुक्तता मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अशा योद्ध्यांची यशोगाथा पुढील पिढीला माहित व्हावी, त्याची प्रेरणा घ्यावी या उद्देशाने ‘राष्ट्रीय सेवा योजना उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन’ यांनी “कोविड युवा योद्धा” हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकामध्ये दयानंद कला महाविद्यालय,लातूर. येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा स्वयंसेवक ‘भरत महादेव पवार’ याच्या कोविड मधल्या निस्वार्थ भावनेने केलेल्या उल्लेखनीय कार्यावर एक स्वतंत्र प्रकरण दिले आहे. भरत पवार ला महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजना कोविंड योद्धा पुरस्कार प्राप्त झाला असून तो सध्या ‘स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून कार्य पाहत आहे. या पुस्तक प्रकाशनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव सिताराम कोठे, इत्यादी मान्यवरांनी पुस्तकाला शुभेच्छा दिल्या आहेत. भरत पवारची शासनाने घेतलेली ही दखल दयानंद परिवारासाठी अभिमानाची व कौतुकास्पद गोष्ट आहे. असे गौरवपूर्ण उच्चार करून दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन तसेच दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजीराव गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सुभाष कदम, प्रा.डॉ.सुनिता सांगोले, प्रा.डॉ.मच्छिंद्र खंडागळे, प्रा.डॉ.संतोष पाटील, प्रा.महेश जंगापल्ले इत्यादींनी. कौतुक पर भरत चे अभिनंदन केले.