परळी तालुक्याचा भूमिपुत्र बजावतोय गेल्या आठ वर्षापासून पुणे येथे परिचारिका म्हणून कर्तव्य

परळी तालुक्याचा भूमिपुत्र बजावतोय गेल्या आठ वर्षापासून पुणे येथे परिचारिका म्हणून कर्तव्य

परळी वैजनाथ (गोविंद काळे) : वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णसेवेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. करोना संकटकाळात परिचारिका वर्गाने करोना वॉरियर्स बनून अहोरात्र रुग्णसेवा केली. त्यांच्या सेवा कार्याला प्रणाम. परळी तालुक्यातील भूमीपुत्र असलेल्या भक्तराम फड यांनी गेल्या आठ वर्षांपासून हे व्रत स्विकारले आहे.परिचारिका दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा सर्वांना प्रेरक ठरणारा आहे.

परळी तालुक्यातील भोजनकवाडी या गावाचे भक्तराम फड हे गेली आठ.वर्षे पुणे येथे परिचारीका म्हणून कर्तव्य बजावत आहेत.जागतिक स्तरावर मातृदिन, पितृदिन आणि आणखी काही दिवस साजरे केले जातात. तसेच रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. कोणत्याही रुग्णालयातील रुग्ण हा डॉक्टरांपेक्षा अधिक काळ परिचारिकेच्या देखरेखीखाली असो. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची परिचारिका या अहोरात्र सेवा करीत असतात. रुग्णाला सकारात्मकता प्रदान करण्याचे, त्यांना आनंद देण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करीत असतात. आताच्या घडीलाही करोनासारख्या महाभयंकर संकटकाळात परिचारिकांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. कुटुंबांची, मुलांची, प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र झटून परिचारिका आपली सेवा अत्यंत चोखपणे बजावत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे योगदान अमूल्य असेच आहे. त्यांच्याशिवाय वैद्यकीय क्षेत्र पूर्णत्वास जाऊ शकत नाही.परिचारिकांना आजही अनेक समस्या भेडसावत आहेत. मात्र, तरीदेखील रुग्णसेवेला प्राधान्यक्रम देत त्या रुग्णांची सेवा करीत आहेत. हजारो परिचारिका वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय कार्यरत आहेत.

भक्तराम फड रा .भोजनकवाडी हे खेड्यातुन जावून गेली आठ वर्षे परिचारिका म्हणून आरोग्य सेवा बजावत आहेत. पिंपरी चिंचवड येथील डाँ.डि.वाय.पाटील हाँस्पिटल येथे कर्तव्य बजावत आहेत. कोवीड काळामध्ये परिचारिकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. आई, वडील, पती, मुले यांच्यापासून दूर राहून काम करावे लागले. समाजाकडून सुध्दा सुरवातीला उपेक्षा सहन करावी लागली. त्यांच्या कुटुंबियांना सुध्दा तेवढाच धोका होता. ते सर्व सहन करून देशसेवा करणाऱ्या सर्व परिचारिकांचा गौरव झाला पाहिजे. या बरोबरच शासकीय रुग्णालयात आजही परिचारिका कमी आहेत. त्यांच्यावर कामाचा ताण वाढत आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात लवकरच परिचारिका भरती प्रक्रिया सुरू केली पाहिजे. यामुळे रुग्णांना सेवा सुलभ होईल. यासाठी ते लढा देत आहेत.महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.परळी तालुक्यातील या भूमीपुत्राने सेवेच्या या क्षेत्रात स्वतः ला वाहून घेतले आहे.नर्स डे च्या निमित्ताने त्यांच्या या कार्याला प्रणाम.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!