लोकनेते विलासराव देशमुख चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेचा रेणापूर येथे शानदार शुभारंभ
खेळाडू व क्रिकेटप्रेमी यांचा मोठा प्रतिसाद
लातूर (प्रतिनिधी) : लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख चॅम्पियन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यात शुक्रवारी रेणापूर तालुक्यांतील क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, माध्यम काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हारिराम कुलकर्णी, जिल्हा सेवा दलाचे अध्यक्ष रमेश सूर्यवंशी, महीला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ पुजा इगे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष मतीन आली सय्यद, निराधार योजनेचे अध्यक्ष गोविंद पाटील, प्रदीप राठोड, पद्म पाटील यांची उपस्थिती होती.
तत्पूर्वी लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालण्यात आला स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले रेणापूर येथील तालुकास्तरीय सामना हरवाडी व आनंदवाडी या दोन संघात झाला या स्पर्धेत रेणापूर तालुक्यांतील ३२ संघांनी सहभाग नोंदवला आहे आजच्या पहील्या दिवशी क्रिकेट प्रेमींनी मोठया प्रमाणावर सामना बघण्यासाठी गर्दी केली होती.
याप्रसंगी रेना साखर कारखान्याचे संचालक पंडित माने, लालासाहेब चव्हान, अनिल कुटवाड, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष माणिक सोमवंशी, नगरसेवक अनिल पवार, भूषन पणूरे, हणमंत पवार, बाळकृष्ण माने, सचिन इगे, प्रशांत माने, अजय चक्रे, प्रदीप काळे, रोहित गिरी, सूरज वंगाटे, कमलाकर आकनगिरे, क्रिकेट खेळाडू आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक तालुका काँग्रेस अध्यक्ष अँड प्रमोद जाधव यांनी केले तर उद्घाटक सर्जेराव मोरे यांनी उपस्थित क्रिकेट खेळाडू याना शुभेच्छा दिल्या.
क्रिकेट स्पर्धे च्या शुभारंभी मान्यवरांनी केली बॅटिंग बॉलिंग
जिल्हाभरात आजपासुन ठिकठिकाणी तालुक्यात विलासराव देशमुख चॅम्पियन क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या आहेत त्यात रेणापूर येथे प्रथम शुभारंभ करण्यात आला त्यावेळी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले रेणा चे अध्यक्ष सर्जेराव मोरे अनंतराव देशमुख यांनी फलंदाजी केली तर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव व पत्रकार हरिराम कुलकर्णी यांनी गोलदांजी करून क्रिकेट प्रेमींना शुभेच्छा दिल्या.