राणा एलेवन क्रिक्रेट क्लब विजेता तर रायझिंग स्टार क्लब उपविजेता
रेणापूर (प्रतिनिधी) : प्रतिनिधी लोकनेते विलासराव चॅम्पियन क्रिकेट ग्रामीण १० टेनिस बॉल क्रिक्रेट स्पर्धा रेणापूर येथे तालुकास्तरावर खुल्या टेनिस बॉल स्पर्धा घेण्यात आल्या. रेणापूर तालुकास्तरावर ३८ स्पर्धेत सहभाग घेतला होता. ग्रामीण भागातील अनेक खेळाडूनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. या स्पर्धेस प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.
या तालुक्यातून स्पर्धेमध्ये राणा रेणापूर कक्रिट क्लब रेणापूर यांनी प्रथम क्रमांक, रायझिंग स्टार क्रिकेट ५१००० क्लब, रेणापूर यांनी व्दितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील देशमुख संघांनी फायनल (अंतिम लढत) राणा एलेवन क्रिकेट क्लब रेणापुर विरुध्द रायझिंग स्टार क्रिक्रेट संघ रेणापूर यांच्यात झाला. राणा एलेवन क्रिकेट क्लब रेणापूर या संघाने १० षटकात प्रथम फलंदाजी करताना १५५ घावा लक्ष दिले होते. रायझिग स्टार संघाने १० षटकात १२० धावा काढल्याने राणा एलेवन क्रिकेट क्लब रेणापूर ३४ धावानी विजयी झाला.
प्रथम क्रमांक पटकावलेल्या एलेवन राणा एलेवन क्रिक्रेट क्लब रेणापूरला एक चषक व रोख रुपये, प्रमाणपत्र पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकवणारे रायझिंग स्टार क्रिकेट क्लब एक चषक रोख रक्कम ३१००० रुपये प्रमाणपत्र पारितोषिक देण्यात आले तसेच या स्पर्धेत मालीकावीर म्हणून अजय हानवते यांना ३००० रुपये चषक बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज चषक महेश जाधव यांना ३००० रुपयांचे बक्षीस व प्रमाणपत्र तर उत्कृष्ट गोलंदाज चषक रोहित जोगदंड यांना ३००० रुपये व प्रमाणपत्र मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव यांच्यासह तालूक्यातील व शहरातील क्रिक्रेट प्रेमी व काँग्रेस कार्यकर्ते मतिनअली सय्यद ( शहरध्यक्ष,) प्रदिप राठोड ( माजी सभापती ) गोविंद पाटील ( तालुकाध्यक्ष संगांयो कमिटी) सौ. इंदुताई इगे (माजी संचालिका ), सौ. पूजाताई इगे ( ता. अध्यक्ष महिला काँग्रेस, महिला शहरध्यक्षा नर्मिला गायकवाड़, तालुका अध्यक्ष हनुमंत पवार, पंडित माने, प्रकाश सूर्यवंशी प्रशांत आकनगिरे ( सदस्य संगायो कमिटी ) सतीश पाटील (चेअरमन सेवा सोसायटी गरसूळी), विश्वनाथ कागले ( सरचिटणीस लातूर ग्रामीण युवक काँग्रेस) शेख, नगरसेवक भूषण पनुरे, अनिल पवार ( तालुकाध्यक्ष ओबीसी सेल) , सचिन पुंडलीकराव इगे ( शहराध्यक्ष विलासराव देशमुख युवा मंच ) प्रदीप काळे (उपाध्यक्ष लातूर ग्रामीण युवक),बाळासाहेब करमूडे ( तालुका अध्यक्ष वद्यिार्थी काँग्रेस ५) गणेश कलाल (शहर सचिव ), महिला काँग्रेसच्या तालुका सचिव रेणुका जोगी, तालुका कार्याध्यक्ष जयश्री गुरव, सुरेखा इगे, रफिक शिकलकर (तालुका प्रतिनिधी पुण्यनगरी), भागवत कारंडे, संयोजक राजाभाऊ राठोड, अल्लाउद्दीन बावचकर, अल्लाउद्दीन बावचकर, घोंडीराम चव्हाण, उत्तम चव्हाण, अजित आकनगिरे, सचिन राठोड आदींची उपस्थिती होती.
