चार लाख रुपये खंडणीची धमकी

चार लाख रुपये खंडणीची धमकी

पिंपरी (रफिक शेख) : चार लाख रुपये दे नाही तर ठार मारेन, अशी धमकी देऊन खंडणी मागण्याचा प्रकार आकुर्डी येथील पंचतारानगर येथे ५ मार्च ते १३ मे या कालावधीत वारंवार घडला. अनिल बाबूराव पवार (वय ४३, रा. रामदास नगर, चिखली) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विशाल अमृत सोनवणे (रा. पंचतारानगर, आकुर्डी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पंचतारानगर आकुर्डी येथे साईट सुरू आहे. फिर्यादी, त्यांचा सुपरवायझर निखिल हरिभाऊ डोंगरे, मित्र नितीश मधुकर कांबळे, कामगार यांना आरोपीने शिवीगाळ करून दमदाटी केली.

About The Author

error: Content is protected !!