विषबाधा घटना प्रकरणी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सुचनेवरून जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही
काँग्रेस पदाधिकारी यांनी भेट देऊन रुग्णांची केली चौकशी
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा लग्नसोहळयातील २०० हून अधिक वऱ्हाडींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समजताच जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासनाला सुचना केल्या होत्या या अनुषंगाने आरोग्य प्रशासनाने दखल घेऊन वीषबाधीतावर तातडीने उपचार सुरू केले. तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य अभय सांळुके व तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विजयकुमार पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्णाच्या प्रकृतीची व रूग्णावर केल्या जाणाऱ्या उपचारांची माहिती घेतली आणि नातेवाईकांना धीर दिला. रूग्णालयातील या सर्व रूग्णाची प्रकृती स्थिर असून आवश्यक उपचार सुरू आहेत.
निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथे विवाह सोहळयास उपस्थित असलेल्या २०० हून अधिक वऱ्हाडींना २२ मे रोजी दुपारी जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या सुचनेवरून आरोग्य शल्यचिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तातडीने रूग्णावर आवश्यक उपचार सुरू केले. रूग्णालयातील रूग्णाची प्रकृती स्थिर असून आवश्यक उपचार सुरू आहेत. तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य अभय सांळुके व तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विजयकुमार पाटील यांनी उपचारार्थ दाखल रूग्णाची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली, उपचाराची माहिती घेतली. तसेच विषबाधा झालेल्या रूग्णाची सदयस्थितीची माहिती पालकमंत्री ना. अमित देशमुख यांना दिली.
