बालाजी जाधव व कल्पना ताई काटकर यांना सुनिर्मल फाउडेशनचा समाज गौरव पुरस्कार प्रदान
मुंबई/ लातूर (प्रतिनिधी) : राजमाता बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा समाजसेवक बालाजी भैय्या जाधव व कल्पना ताई काटकर यांना मुंबई येथील सुनिर्मल फाउडेशन च्या वतीने समाज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दि. 22 मे रोजी सकाळी 10 वाजता धारावी मंबई येथे समाज गौरव पुरस्कार बालाजी भैय्या जाधव व कल्पना ताई काटकर यांच्या कार्याची दखल घेत यांना मुंबई येथील सुनिर्मल फाउडेशन च्या वतीने धारावी येथे समाज गौरव पुरस्कार जगन्नाथ राव हेगडे,( मा. नगर पाल मुंबई), सुकृत खाडेकर (संपादक प्रहार), विलास खानोलकर (कवी, लेखक सदस्य ,फिल्मीसेसाॕरबोर्ड दिल्ली), डाॕ. लक्ष्मण शिवणेकर (जेष्ठ शिक्षक तथा साहित्यिक), मुनीर खान (संपादक झुंझार केशरी), राजेश खंदारे (जेष्ठ समाज सेवक), महादेव शिंदे (जेष्ठ समाज सेवक), शिवलिंग व्हटकर (जेष्ठ समाज सेवक), रमेश कदम (जेष्ठ समाज सेवक) यांच्या हास्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॕड .शैलेश खंदारे, सरचिटणीस राम म्हस्के, खनिजदार ओमकार खंदारे व आदी इतर सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल बालाजी जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.