विनयभंगप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

विनयभंगप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

पिंपरी (रफिक शेख) : शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण केली. तसेच तिला जबरदस्तीने लघवी पाजण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चार महिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सूसगाव येथे १५ मे रोजी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत पीडित महिलेने शनिवारी (दि. २१) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिला सासऱ्यासोबत तिच्या चुलत सासऱ्याकडे गेली. तुम्ही आम्हाला शिवीगाळ का केली, असा जाब महिलेने विचारला. या कारणावरून संतप्त झालेल्या आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या सासऱ्यांना चप्पल, काठी, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपींनी बाटलीमध्ये लघवी गोळा करून ती फिर्यादी यांना जबरदस्तीने पाजण्याचा प्रयत्न केला.

About The Author

error: Content is protected !!