२३ लाखांचे हिरेजडीत दागिने केले लंपास

२३ लाखांचे हिरेजडीत दागिने केले लंपास

पुणे (रफिक शेख) : मगरपट्टा सिटी भागात राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या प्ि घरातून २३ लाखांचे हिरेजडीत दागिने लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाच्या घरात काम करणाऱ्या महिलेला अटक केली. राधा अशोक झा (वय ३७, रा. वैदुवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

About The Author

error: Content is protected !!