घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरी

घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरी

पिंपरी (प्रकाश इगवे) : घराचे कुलूप तोडून घरातील सामानाची नासधूस केली. तसेच सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला. विजयनगर, काळेवाडी येथे शुक्रवारी (दि. २०) रात्री दहा ते शनिवारी (दि. २१) रात्री एक या कालावधीत ही घटना घडली. आसिफ जब्बार मुजावर (वय २२, रा. गणेशनगर, तळवडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. बीबी आयेशा अब्दुलसलाम कालीजकर (वय २८, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी शनिवारी (दि. २१) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी बीबी या २० मे रोजी रात्री जावेकडे झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी मुजावर याने फिर्यादीच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील पाच तोळे वजनाचे दागिने, रोख रक्कम असा एकूण एक लाख ८३ हजार *300 रुपयांचा ऐवज चोरून नेला. तसेच घरातील इतर साहित्याची तोडफोड करून नासधूस केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

About The Author

error: Content is protected !!