आक्षेपार्ह; मेसेज पाठवून चिमुरडीची बदनामी

आक्षेपार्ह; मेसेज पाठवून चिमुरडीची बदनामी

पिंपरी (रफिक शेख) : फारकत झाल्याच्या कारणावरून एका महिलेने अडीच वर्षाच्या मुलीबाबत वाईट मेसेज पाठवून तिची बदनामी केली. प्राधिकरण येथे २१ एप्रिल २०१८ ते ६ मे २०२२ या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी मंगळवार पेठ, पुणे येथे राहणाऱ्या एका २७ वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत अडीच वर्षीय मुलीच्या आईने शनिवारी (दि. २१) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी महिला हिची फिर्यादी महिलेच्या पतीसोबत लग्नाची फारकत झाली. यामुळे चिडून जाऊन तिने मोबाइलवर फिर्यादीचे नातेवाईक यांना फिर्यादीच्या अडीच वर्षीय मुलीबाबत अश्लील, वाईट मेसेज केले. इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅपवर पाठवून बदनामीकारक मेसेज पाठवून फिर्यादीचा विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे. सोशल मीडियावरुन बदनामीच्या घटना घडत आहेत.

About The Author