कोयता बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

कोयता बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

पिंपरी (प्रकाश इगवे) : बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. या कारवाईत पोलिसांनी एक लोखंडी कोयता जप्त केला. आनंदनगर झोपडपट्टी येथील माल धक्क्याजवळ रेल्वे पटरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिंचवड येथे शुक्रवारी (दि. २०) रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ऋषिकेश ऊर्फ सोन्या नवनाथ सलगर (वय २२, रा. विजयनगर झोपडपट्टी, चिंचवड) आणि बंटी उर्फ किरण खरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस कर्मचारी गोविंद देवराव डोके यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश ऊर्फ सोन्या सलगर हा बेकायदेशीर कोयता बाळगत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करून आरोपीकडून एक लोखंडी कोयता जप्त केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

About The Author