वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; तिघांवर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी (प्रकाश इगवे) : पैशांचे आमिष दाखवून दोन महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हॉटेल के. इन, भूमकर चौक, वाकड येथे गुरुवारी (दि. १९) रात्री बाराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. पायल, हिरा आणि हॅप्पी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस नाईक मोहम्मद गौस नदाफ यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २०) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद आरोपींनी पीडित दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. याबाबत माहिती मिळाली असता पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी कारवाई केली. यात पीडित दोन महिलांची सुटका करण्यात आली. तसेच ८२ हजरांचा मुद्देमाल जप्त केला.

About The Author

error: Content is protected !!