मलकापूर ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामांचे उद्घाटन – मुन्ना पाटील

मलकापूर ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामांचे उद्घाटन - मुन्ना पाटील

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहराचे उपनगर असलेल्या मलकापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आपल्या हद्दीत क्रांतीनगर येथे मूलभूत सुविधा अंतर्गत पंधरा लाख रुपयाचे सिमेंट रस्त्याचे काम तसेच क्रांती नगर येथील मारुती मंदिर समोरील सभागृहाचे पंधरा लक्ष रूपये खर्चाचे बांधकाम तसेच मनरेगा योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता वीस लक्ष रुपयाचे फेवर ब्लॉक करण्याचे कामाचे उद्घाटन उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा मलकापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच प्राची प्रताप भालेराव, ग्रामपंचायत सदस्य गूरूनाथ अण्णा बिरादार, शिवलिंग मुळे ,महबूब शेख, शेख गणी ,खताळताई व समस्त क्रांति नगर येथील रहिवासी प्राधान्याने नरसिंग कांबळे, आयुब पठाण, शिवाजी काळे,अतिक शेख, रमेश कानादे, दामुवाले संजय व ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक संतोष पाटील, ग्रामपंचायत ची लिपिक शिवराज भ्रमण्णा इत्यादी उपस्थित होते. ग्रामपंचायत अंतर्गत होत असलेल्या विकास कामांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

About The Author

error: Content is protected !!