शेतकरी बांधवांनी सोयाबीन उत्पादकता वाढ व मुख्य साखळी विकास योजनेचा लाभ घ्यावा – आ. बाबासाहेब पाटील

शेतकरी बांधवांनी सोयाबीन उत्पादकता वाढ व मुख्य साखळी विकास योजनेचा लाभ घ्यावा - आ. बाबासाहेब पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : चाकुर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत नुकतेच कृषी विभागाकडून राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ व मुख्य साखळी विकास योजना अंमलबजावणीसाठी चर्चासत्र, पूर्व नियोजन कार्यक्रमाचे मौजे तेलगाव येथे आयोजन केले होते. या कार्यक्रम प्रसंगी आमदार बाबासाहेब पाटिल उपस्थित होते. सोयाबीन सोयाबीन उत्पादकता वाढ व मुख्य साखळी विकास योजना या वर्षी महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत मौजे तेलगाव येथे राबवली जाणार आहे. यामधून शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी अनुदान सूक्ष्म मूलद्रव्य, पिक संरक्षण औषधे, बीबीपी यंत्रसाठी अनुदान, ट्रप्स आणि लुअर्स साठी अनुदान, १०० हेक्टर संत्रासाठी झाडे आदींसाठी शेतकरी बांधवांनी २५ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऑनलाइन अर्ज करून लाभ घ्यावा. ही योजना शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनेत सहभागी होऊन अधिक लाभ घेण्याचे आवाहन यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले. सोयाबीन पिकाची अष्ट सूत्री सांगून सोयाबीन पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी पूर्वमशागत ते काढणीपर्यंत तंत्रज्ञान कृषी सहाय्यक भारती मुरलीधर यांनी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी भगवान तवर, आभार प्रदर्शन सचिन घुमे, कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच पंढरीनाथ जाधव, मंडळ कृषी अधिकारी शरद पवार, कृषी कृषी सहाय्यक प्रवीण फड, कृषी पर्यवेक्षक दिगंबर देशमुख, चंद्रशेखर फुलमंटे, प्रगतशील शेतकरी वेंकट पस्तापुरे, लहू पढेकर, ज्ञानोबा पस्तापुरे, शिवाजी खिडसे, कोकरे सर, बेंबडे सर, प्रवीण, देवानंद जाधव, सुधाकर बेंबडे, खिडसे गजानन आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

About The Author