आंदेकर टोळीतील फरार आरोपी आणि पोलीसात नाना पेठेत सिनेस्टाईल थरार
पुणे (रफिक शेख) : मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला समर्थ पोलीस ठाण्यातील तपास पथकाच्या पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत. तन्मय गणेश कांबळे (वय १९ रा, राजेवाडी नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असुन तो पुणे शहरातील आंदेकर टोळीचा सदस्य आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या टोळीवर नुकतीच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई केली होती. यामध्ये आरोपी तन्मय कांबळे हा फरार होता.
दोन महिन्या पूर्वी आरोपी तन्मय कांबळे व त्याच्या साथीदारानी काळेपडळ . हडपसर परिसरातील एका दाम्पत्याला दमदाटी करून. आंदेकर टोळी चा धाक दाखवुन मला पैसे मागता का. तुम्हाला माहीत नाही का आम्ही ए गँगचे आहोत. आमच्या पुढे आवाज नाही करायचा. नाहीतर खेळ खल्लास अशी दमदाटी करून गोंधळ घालत परिसरात दहशत पसरवली होती. तसेच डोक्यात कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता.या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का कारवाई करण्यात आली असून आरोपी तन्मय कांबळे फरार होता.
दरम्यान समर्थ पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीमध्ये तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे राष्ट्रपतींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार हेमंत पेरणे यांना माहीती मिळाली की. मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेला आरोपी तन्मय कांबळे याचा जामीन रद्द झाला असुन आरोपी मंगळवार पेठ येथे येणार असल्याची माहीती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला असता तो सार्वजनीक रोडच्या कडेला उभा असल्याचे दिसला. पोलीस त्याला पकडण्यासाठी गेले असता आरोपीला पोलीसांची चाहुल लागताच त्याने गर्दीचा फायदा घेत दुचाकीवरून राँग साईडने पळुण जाऊ लागला . तपास पथकातील सहायक पोलीस निरिक्षक संदिप जोरे. पोलीस अंमलदार हमेंत पेरणे. शुभम देसाई यांनी त्याचा एक किलोमिटर पर्यंत सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पुढील कारवाई साठी आरोपीला हडपसर पोलीस स्टेशच्या ताब्यात देण्यात आले.
हि कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता. सह पोलीस आयुक्त संदीप कार्णिक. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे . पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 डॉ. प्रियंका नारनवरे. सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग सतिश गोवेकर . वरिष्ठ पोलीस निरिक्षक विष्णु ताम्हाणे. पोलीस निरिक्षक गुन्हे उल्हास कदम यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे. पोलीस हवालदार संतोष काळे. सुशील लोणकर. पोलीस नाईक शुभाष पिंगळे . पोलीस अंमलदार हेमंत पेरणे. शुभम देसाई. सुभाष मोरे. विठ्ठल चोरमले. महेश जाधव. निलेश साबळे. शाम सुर्यवंशी यांनी केली.