दारावती तांडा येथील 11 वर्षांपासुन सर्वाधिक ऊसवाहतुक करणार्या प्रेमदास पवार यांचा डॉ.संतोष मुंडे यांच्याकडुन सन्मान

दारावती तांडा येथील 11 वर्षांपासुन सर्वाधिक ऊसवाहतुक करणार्या प्रेमदास पवार यांचा डॉ.संतोष मुंडे यांच्याकडुन सन्मान

परळी वैजनाथ (गोविंद काळे) : सिध्दी शुगर साखर कारखान्यासाठी ऊस वाहतुक करणारे परळी तालुक्यातील दारावती तांडा येथील प्रेमदास पवार यांनी आपल्या ट्रक,ट्रॅक्टर व मिनी ट्रॅक्टरद्वारे सर्वाधिक ऊस वाहतुक करुन विक्रम केला आहे.त्यांचा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र मंडळाचे डॉ. संतोष मुंडे यांनी सन्मान केला. तालुक्यातील दारावती तांडा येथील प्रेमदास पवार हे सिध्दी शुगर कारखाण्यास ऊस वाहतुक करतात. गत 11 वर्षांपासुन MH 22 AA 1111 ट्रक,MH 44 Z 1011 ट्रॅक्टर व MH 44 D 4134 या मिनी ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतुक करुन सर्वाधिक ऊस वाहतुक करुन विक्रम केल्याबद्दल राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र मंडळाचे डॉ. संतोष मुंडे यांच्या प्रेमदास पवार यांचा सन्मान करत पाठीवर कार्याची थाप दिली. यावेळी डॉ. संतोष मुंडे, संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिध्देश्वर मुंडे, सचिन मुंडे, गुरूदत्त कराड, विठ्ठल साखरे, दहिफळे, प्रविण पवार, पंडित किशनराव राठोड, पंडित बाबुराव राठोड, बाळू रामराव पवार, विकास गंपू राठोड, त्रिंबक बाबुराव राठोड आदी उपस्थित होते.

About The Author