शिवसैनिकांनी निवडणुकांसाठी सज्ज राहावे – कांबळे
उदगीर (अॅड.एल.पी.उगीले) : येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. त्यासोबतच महाआघाडी जो निर्णय घेईल त्या निर्णयाला अनुसरून पक्ष संघटनेला काम करावे लागेल. असे असले तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला चांगला वाटा असेल, त्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहून विजय मिळवता येईल. या दृष्टीने कार्य करावे. असे आवाहन शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख देवेंद्रजी कांबळे यांनी केले.
ते उदगीर तालुक्यात शिवसेना कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधताना बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते , प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच युवा सेना आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसेनेवर प्रेम करणारे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी स्वतः देवेंद्रजी कांबळे यांनी सर्वांशी भेटून सर्वांच्या सोबत सविस्तर चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी ऐकून घेतल्या. तसेच संघटन बांधणी करण्याच्या दृष्टीने काय काय करावे लागेल? याचाही कानमंत्र देवेंद्रजी कांबळे यांनी दिला .याप्रसंगी प्रामुख्याने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामचंद्र आदावले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, विधानसभा प्रमुख श्रीमंत सोनाळे ,माजी पंचायत समिती सभापती ऍड. ब्रह्मजी केंद्रे, अंकुश कोंनाळे, विकास जाधव, रामदास काकडे, मनोज पाटील ,बाळू वडले, मच्छिंद्र मोरे, लखन घोणसे ,युवासेना उपजिल्हाधिकारी रमण माने, उपेंद्र काळेगोरे, रोहित पाटील, विशाल कांबळे, युवासेना पदाधिकारी अनिल पंचाक्षरी, प्रदीप पाटील, गंगाधर बाजीगिरे, महिला आघाडीच्या विधानसभा प्रमुख अरुणाताई लेंडाणे तसेच सर्व महिला पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसैनिक सर्व ताकदीनिशी काम करतील, आणि शिवसेनेला प्रचंड बहुमताने विजयी करण्याच्या दृष्टीने आघाडीचा धर्म पाळत कार्य करतील. असा विश्वास शिवसेनेचे उदगीर तालुका प्रमुख चंद्रकांत तेंगेटोल यांनी दिला.
