विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने बोरवटी येथे ई – श्रम कार्ड व डिजिटल हेल्थ कार्ड चे वाटप
लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील बोरवटी येथे विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने गावातील लाभार्थींना ई- श्रम कार्ड व डिजिटल हेल्थ कार्ड संबंधित सुवीधा देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत योजनेतील लाभार्थींना सर्व सुवीधा मोफत देऊन कार्डचे वितरण करण्यात आले.
विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने बोरवटी येथे गावातील लाभार्थीसाठी ई- श्रम कार्ड व डिजिटल हेल्थ कार्ड संबंधित सुवीधा देण्यात आली लाभार्थींना ऑनलाईन मोफत अर्ज भरून सर्व गावकऱ्यांना मोफत डिजिटल हेल्थ कार्ड व ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या समन्वयक संगीता मोळवणे, उपसरपंच अमोल माने, इसोल्युशनचे संचालक लजीले, गणेश नाथजोगी, दादा खुणे, बालाजी रनखांब व गावातील लाभधारक उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
