मानवतेसाठी योगाचा आधार घेतला पाहिजे – डॉ.संदिपान जगदाळे

मानवतेसाठी योगाचा आधार घेतला पाहिजे - डॉ.संदिपान जगदाळे

दयानंद शिक्षण संस्थेत योग दिन उत्साहात साजरा

लातूर (प्रतिनिधी) : शरीरासोबतच योगा मानसिक आरोग्यासाठीही उपयुक्त ठरतो. कोरोनामुळे लोकांना चिंता, नैराश्य यांसारख्या मानसिक व शारीरिक समस्यांनाही सामोरे जावे लागले. जे सध्या मानवतेसाठी सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामुळे मानवतेसाठी योगाचा उपयोग केला पाहिजे असे प्रतिपादन डॉ.संदिपान जगदाळे यांनी केले. ते दयानंद शिक्षण संस्था अंतर्गत आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग शिबिरास बोलत होते.

पुढे ते म्हणाले की,”आंतरराष्ट्रीय योग दिनाचे यंदा आठवे वर्ष आहे. भारतीय योग विद्येतून जगाला मानवतेचा संदेश दिला जात आहे. भारतासोबतच आता संपूर्ण जग योगाचा स्वीकारत करीत आहे. हा एका अर्थाने भारतीय संस्कृतीचा विजय आहे.” आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त आयोजित योग शिबिरात डॉ संदिपान जगदाळे व प्रा नरेश हलकी यांनी योग प्राणायाम व ध्यान याचे धडे दिले. याप्रसंगी दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके, दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला , दयानंद फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. क्रांती सातपुते, दयानंद विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पूनम नाथानी, इन्स्टिट्यूटऑफ टेक्निकल एज्युकेशनचे प्राचार्य प्रीती पटवारी उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व 738 योगासन प्रशिक्षणार्थी याप्रसंगी उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी क्रीडा संचालक डॉ. अशोक वाघमारे, डॉ. नितेश स्वामी, डॉ. महेश बेंबडे, डॉ. विक्रम चिंते, प्रा.विलास कोमटवाड, श्री. विकास खोगरे व श्री. प्रीतम मुळे यांनी परिश्रम घेत आहेत.

About The Author

error: Content is protected !!