सत्कारातून काम करण्याची प्रेरणा मिळते – डाॅ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी
अहमदपूर (गोविंद काळे) : समाजात चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी जनता निश्चितपणे थांबत असते.फक्त आपण आपले काम प्रामाणिक पणे करत रहाणे गरजेचे आहे.अशा सत्कार कार्यक्रमांमधून काम करणार्यास नव्याने अधीक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले. सम्राट मित्र मंडळाच्या वतीने आयोजीत सत्कार सोहळ्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. शिक्षक नेते गिरीषभाऊ गोंन्टे सर,शिवसेना शहरप्रमुख लक्ष्मणराव अलगूले,समाजशास्त्र विभाग प्रमूख प्रा.डाॅ. सतिश ससाणे सर आदींचा त्यांच्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. योगायोगाने या मान्यवरांचे वाढदिवस असल्याने सोबतच अभीष्टचिंतन सूध्दा करण्यात आले.
पूढे बोलताना डाॅ.सिध्दार्थकूमार सूर्यवंशी म्हणाले की,एक परिपूर्ण कार्यकर्ता तयार होण्यासाठी किमान दहा वर्ष लागतात.समाजातील सामान्य घटकांना न्याय देण्याची भूमिका कार्यकर्त्यांची असून अडचणीच्या काळात ठाम पणे उभे रहाणे गरजेचे आहे.इतरांसाठी आपला वेळ देणे ही बाब सूध्दा तेवढीच महत्वाची आहे. सामाजिक प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी कोणी पूढे येत असेल तर त्यास सहकार्य करावे. काम करणाऱ्याच्या पाठीमागे जनतेने सूध्दा खंबीरपणे रहावे असे अवाहन केले. या प्रसंगी सत्कार मूर्तीचे सूध्दा समायोचीत भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव तलवारे सर यांनी केले तर आभार दादासाहेब देशमूख यांनी मानले. यावेळी मधूकरराव आगलावे,डाॅ.आकरूपे सर,शिवाजीराव भालेराव, विठ्ठलराव बोराडे, प्रकाश नागमे,राजकुमार मेकाले, मूकूंद वाघमारे, मल्हारी कांबळे, प्रेम सोनकांबळे, तिरूपती वाघमारे,प्रकाश वाघमारे, अमोल ससाणे, सचिन बानाटे,अजय भालेराव आदींची उपस्थिती होती.
