राजर्षी शाहू महाराज चौक नामफलकाचे अनावरण.!

राजर्षी शाहू महाराज चौक नामफलकाचे अनावरण.!

अहमदपूर (गोविंद काळे) : छत्रपती राजर्षी शाहूमहाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शाहूमहाराज चौकाच्या नामफलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी हे होते तर युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अँड. अमित रेड्डी यांच्या हस्ते या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. शहरातील नांदेड-लातूर रोडलगत या चौकाची स्थापना करण्यात आली होती.पालिकेने ठराव घेवून या संबंधीची कार्यवाही पूर्ण केली होती.त्यानूसार या चौकात वेळोवेळी विविध कार्यक्रम सूध्दा येथे पार पाडले जायचे. मध्यंतरी वहातूक व रस्ता रुंदीकरणामूळे येईल ध्वजस्तंभ काढण्यात आला होता. आता नव्याने रस्त्याच्या कडेला शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

या प्रसंगी अँड.अमित रेड्डी,बसपानेते अँड.रमेशराव गायकवाड, डाॅ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांची समायोचीत भाषणे झाली. या वेळी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे नेते कला शिक्षक चंद्रशेखर भालेराव, पंचायत समिती कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे, आकाश सांगवीकर, वाघमारे गुरूजी, मूळे साहेब, विनोद गायकवाड, मूकूंद वाघमारे, नरसिंग सांगवीकर, अजय गायकवाड, अमित गायकवाड,सोनकांबळे आदीं बरोबर शाहू महाराज मित्रमंडळाचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!