प्रभुराज प्रतिष्ठाण, लातूरच्या वतीने वंचित व गरजू लोकांना मदत

प्रभुराज प्रतिष्ठाण, लातूरच्या वतीने वंचित व गरजू लोकांना मदत

लातूर (प्रतिनिधी) : दि.२७.०६.२०२२ रोजी प्रभुराज प्रतिष्ठाण, लातूर वतीने पावसासपासून शरीर भिजू नये व त्यापासून आजार होऊ नये या करिता पावसाळी मोसमात गरजू व वंचित लोकांना पावसापासून बचावासाठी शरीर कवच (कुंची) वाटप करण्याचे उपक्रम हाती घेतला जेणे सध्या पावसाळी मोसमचे वातावरण वाडत असल्याने प्रत्येकजण पावसापासून शरीर भीजु नये व आजार होऊ नये याची काळजी घेत छत्री व शरीर भिजू नये या करिता पावसाळी कपडे परिधान करतात त्याच परिस्थिती लातूर शहरात बेघर आणि निराधार लोक कश्याचा तरी आसरा घेत निपुटपणे शरीर भिजून कुडकुडत बसलेले व झोपत असत पण त्यांचे ही पावसापासून बचाव व पाण्याचा सामना करण्यासाठी प्रभुराज प्रतिष्ठाणने पुढाकार घेऊन वंचित लोकांना त्यांचे पावसाच्या पाण्यामुळे शरीर भिजू नये व आजारास सामोरे जाऊ नये या करिता मायेची चादर पांगरण्यात आली तसेच वंचित,गरजू लोकांचा शोध घेत त्यांची सेवा करण्याकरिता ते दिसून येताच सामाजिक बांधलकी जपून यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि जसे जमेल तसे सहकाऱ्याच्या साहाय्याने अंग कवच (कुंची) वाटप करून कर्तव्य निभावण्याचा प्रयत्न केला कोणी वेढ्याच्या परिस्थिती आढळून आले असता त्यांचे गैरवर्तणुक व छिडछिडेपणा ही सहन करत त्यांना आपल्यात सांभाळून घेत तेही मानव आहेत अशी भावना ठेवत त्यांनाही मदत केली. यावेळी प्रभुराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड. अजय कलशेट्टी, नंदा हमीने सौ. जमदाडे, डॉ. संजय जमदाडे, आजुभाऊ पल्लोड, हेमंत वडने, दत्ता ढगे, शाम मोरे, बंडापा जवळे, मोतीराम कदम, शिवाप्पा धुळे, शेख हुसेन, सुनील कोटलवार, आनंद जवळे, शिवा रोडे, मुन्ना बट्टेवार, दीपक प्रयाग, सौरभ कलशेट्टी, रवी घुगरे, अजिंक्य रेड्डी, राम डूमने, आदीनि परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!