उदगीर शहरालगतच्या रिंग रोड साठी 140 कोटीचा निधी मंजूर ; गृहराज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नास यश
उदगीर : उदगीर शहरातील विस्कळीत झालेली रहदारी सुरळीत व्हावी अवजड वाहने उदगीर शहराच्या बाहेरूनच जावीत तसेच ज्या वाहनांना नांदेड किंवा बिदर रस्त्यावर जायचे आहे त्यांना शहरात जाण्याची आवश्यकता पडू नये यासाठी वळण रस्ता काळाची गरज आहे पूर्व बाजूला वळण रस्ता झाला खरा मात्र मलकापूर फाटा ते नांदेड बिदर रोड यादरम्यान च्या वळण रस्त्यावर रेल्वे फाटक नसल्याने तो रस्ता होऊनही करणे शक्य नव्हते. त्यामुळे तो रस्ता होऊनही काही कामाचा नव्हता, तसेच दुसऱ्या बाजूनेही रस्ता होणे गरजेचे होते ही गोष्ट विचारात घेऊन उदगीर चे आमदार तथागृह राज्यमंत्री ना संजय बनसोडे यांनी तब्बल दीड वर्षापासून सतत पाठपुरावा करून रिंग रोडचा प्रश्न निकाली काढला आहे. यापूर्वी त्यांनी राज्यमार्ग आणि अंतर्गत रस्त्याचा ही प्रश्न 25 ऑगस्ट 21 रोजी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना भेटून मंजूर करून घेतला आहे
उदगीर शहराची खरी गरज आणि व्यापार यांची मागणी विचारात घेऊन जनतेच्या मागणीला न्याय द्यावा म्हणून ना संजय बनसोडे यांनी पूर्व बाजूचा जो वळण रस्ता आहे तो वळत असतात पूर्ण करण्यासाठी आणि या रस्त्यावर येणाऱ्या रेल्वे फाटकाच्या ठिकाणी उड्डाणपूल बनावे या उद्देशाने केंद्र शासनाकडून 140 कोटी रुपये मंजूर करून घेतले आहे. ना.संजय बनसोडे यांचा विकासाचा सतत सपाटा चालूच आहे, वेगवेगळ्या विभागाकडून आपल्या मतदार संघात विकास निधी कसा आणता येईल याचा पूर्ण आराखडा त्यांनी तयार केलेला असून त्या आराखड्यानुसार उदगीर विधानसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले
उदगीर शहराच्या सर्वांगीण विकासाचे प्रयत्न सतत चालू राहणार असून ही विकासाची गंगा उदगीर विधानसभा मतदारसंघात कायम राहील असा विश्वासही राज्य गृहमंत्री ना संजय बनसोडे यांनी दिला आहे . यापूर्वीही उदगीरच्या विकासासाठी राज्य शासनाने भरीव निधी मंजूर केला आहे. सर्वांगीण विकासात सोबतच पायाभूत विकासाला प्रामुख्याने प्राधान्य देण्यात आले आहे उदगीर शहरातील विकासामध्ये रस्ते, नाले ,पाणी पुरवठा योजना, प्रशासकीय इमारत , उद्याने,विविध जाती समुहाचे धार्मिक सभागृह, शहरातील महापुरुषांचे पुतळे, यांचा समावेश आहेच, यासोबतच उदगीर शहराला जोडणाऱ्या व शहरातून येत आहेत.
सर्व कामे अत्यंत दर्जेदार आणि टिकाऊ व्हावी अशी मागणी जनतेची आहे पूर्वी झालेली कामे तकलादू झाली असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिक करत आहेत या गोष्टीचे गांभीर्य राज्यमंत्र्यांनी घ्यावे आणि ज्या गतीने विकास निधी आणला जातोय त्याच गतीने काम होत असताना त्याचा दर्जाही तपासला जावा अशीही मागणी होत आहे.
उदगीर शहरच नव्हे तर संपूर्ण परिसराच्या विकासाचा विचार करून या भागातील व्यापारी तसेच नागरिकांची अनेक वर्षापासूनची उदगीर वळण नाश्त्याची असलेली मागणी होय ,यालाही मंजुरी मिळाली असुन यासाठी शासनाने 140 कोटी निधी उपलब्ध करून दिला.
राज्याचे गृहराज्यमंत्री तथा उदगीर चे लोकप्रिय आमदार संजय बनसोडे यांनी पाठपुरावा करून उदगीर लगतचा वळण रस्ता मंजूर करून घेतला आहे. शहरातचा होणारा विकास आणि वाढत जाणारी लोकसंख्या आणि वाढत जाणारी वाहनांची संख्या रहदारी चे प्रश्न या सर्वांचा विचार करून वळण रस्ता अत्यंत आवश्यक होता, त्याला गती देण्यासाठी राज्यमंत्र्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून 140 कोटी रुपये मंजूर करून आल्याबद्दल उदगीर ची जनता त्यांच्याबद्दल समाधानी आहे.
नव्याने मंजूर झालेला वळण रस्ता हनुमान मंदिर ते पिंपरी तलाव, सौनिकी शाळा, अवलकोंडा हद्दीतील बोरताळा फाटा येथून करण्यात येणार असून या ची लांबी जवळपास 13 किलोमीटर असणार आहे. शहराजवळून जाणाऱ्या गवळण रस्त्या मुळे शहरात होणारी अनावश्यक अशी वाहतूक वळण रस्त्याच्या मार्गे शहराबाहेर जाण्यास मदत होणार आहे.
उदगीर शहर हे व्यापारी दृष्टीने अतिशय महत्त्वाचे शहर असून या वळण रस्त्या मुळे फायदा होणार आहे.
राज्यमंत्री ना संजय बनसोडे उदगीर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करत असून नागरिकांची कोणतीही अडचण होणार नाही याचा विचार करून विकासाचा आराखडा आखून प्रत्यक्ष त्याची कारवाई करण्यासाठी संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्या गाठीभेटी घेणे आणि विकास कामाचा पाठपुरावा करणे हे त्यांनी चालू ठेवले आहे. परिणामतः उदगीर शहराचा सर्वांगीण विकास होत आहे . यापुढीलही काळात ही असाच विकास सुरू राहील या भागाच्या विकासासाठी पुढील काळात कोणती समस्या येणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही यावेळी ना. संजय बनसोडे यांनी दिली आहे उदगीर विधानसभा मतदार संघाच्या विकासाच्या अनुषंगाने गावच्या सरपंचांनी, चेअरमन, नागरिक यांनी सूचना कराव्यात सकारात्मक आणि सृजनशील कामासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे ही याप्रसंगी नामदार संजय बनसोडे यांनी सांगितले.
