गाधवड सोसायटी बिनविरोध निवडून आल्याबद्दल माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार
लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील गादवड विवीध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध निवडून आलेल्या चेरमनपदी संभाजी दादा भिसे व व्हॉइस चेअरमन पदी खंडू नाना कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्याबद्दल दि. 30 जुन वार गुरुवार रोजी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
गाधवड सोसायटीत संचालक मंडळ म्हणून कदम गोपीनाथ पंढरी, भिसे अशोक तात्याराव, कदम दत्तात्रय ज्ञानोबा, माने बाप्पासाहेब विठ्ठलराव, माने श्रीराम भगीरथ, जाधव पंडित संतराम, गोरे रणजित रामा, कदम रत्नमाला गोरोबा, भिसे मंदाकिनी राजाभाऊ, कुंभार राजाभाऊ महादू, पानढवळे ओम तात्याराव यांची निवड सर्व गावकऱ्यांच्या सहमतीने करण्यात आली.
या वेळी गाधवड येथील मदनअण्णा भिसे, राजाभाऊ बापू भिसे, अमोल भिसे, भगीरथ माने, राजाभाऊ भिसे, दत्ता कदम, गणू काका कदम, प्रशांत काटे आदी मान्यवर उपस्थित होते.
