अखिल भारतीय अंतरविद्यापीठ स्पर्धेत दयानंद कला महाविद्यालयाचे दैदिप्यमान यश

अखिल भारतीय अंतरविद्यापीठ स्पर्धेत दयानंद कला महाविद्यालयाचे दैदिप्यमान यश

लातूर (प्रतिनिधी) : आखिल भारतीय अंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा शै.वर्ष 2021-22 मध्ये पॉवर लिफ्टींग या स्पर्धा उदयपूर येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत दयानंद कला महाविद्यालयाच्या खेळाडू सितल सावंत हिने रजत पदक प्राप्त केले यांच प्रमाणे यापूर्वी   झालेल्या आखिल भारतीय अंतरविद्यापीठ स्पर्धेत रजत पदक प्राप्त केले तसेच अशियन स्पर्धा तुर्की येथे संपन्न  झाल्या होत्या त्या मध्ये बँचप्रेस व स्कॉट मध्ये सुवर्ण तर वेट लिफ्ट मध्ये रजत पदक प्राप्त कले व दुस-या पॉवर लिफ्टिंग एशियन स्पर्धा उदयपुर येथे संपन्न झाल्या होत्या त्यामध्ये बँचप्रेस व स्कॉट या क्रीडा प्रकारात सुवर्ण तर डेटलिफ्ट यामध्ये रजत पदक प्राप्त केले. तसेच डिसेंबर 2022 मध्ये मध्ये होणा-या वर्ल्ड पॉवर लिफ्टींग चॅम्पीयन स्पर्धेत तिची निवड झाली आहे. दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी लक्ष्मीरमण लाहोटी यांनी सत्कार केला. या प्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन, तसेच दयानंद‍ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, दयांनद कला महाविद्यालचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य श्री.अनिलकुमार माळी, डॉ. नितेश स्वामी, डॉ. अशोक वाघमारे, डॉ.मिलींद माने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!