परचंडा ग्राम पंचायत जिल्ह्यात कृषी क्षेत्रात ठरली आदर्श

परचंडा ग्राम पंचायत जिल्ह्यात कृषी क्षेत्रात ठरली आदर्श

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील परचंडा ग्रामपंचायत ने कृषी क्षेत्रात क्रांती करत आहे. ग्रामपंचायतीने बांधापर्यंत रस्ता, जास्तीत जास्त विहीरी, दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी गाय गोठे, बांधावर झाडे, फळबाग योजना, शेतक – यांना कृषी अवजारे त्यात सायकल कोळपे, सरते, सोयाबीन टोकण यंत्र, सोयाबीन ग्रॅन्डर, कडबा कुट्टी यंत्र इ. शेतक- यांना” मोफत वापर करा व आणून देणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत आहे. या योजनेला शेतक- याचा उत्सफुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. अनेक छोट्या छोट्या शेतक- यांना ही साधने घेणे शक्य नसते पण ते प्रयोगशील असतात. त्यांना प्रोत्साहन व चालना देण्याचे काम ग्राम पंचायत कार्यालय परचंडा तर्फे करण्यात येत आहे . या तत्त्वावर तसेच ग्रा. प. तर्फे हवा भरण्याची मशिन सुध्दा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सायकल, दु व्हीलर, फोर व्हीलर, ट्रॅक्टर यांना मोफत हवा भरुन दिली जाणार आहे. “गावचा विकास शेतक – यांचा विकास हाच ग्रामपंचायतचा ध्यास “या उक्तीप्रमाणे काम करत आहोत. अनेक छोट्या शेतक – यांकडे शेतीचे अवजारे उपलब्ध नसतात ती अवजारे ग्राम पंचायतीने, उपलब्ध करुन दिली आहेत. शेतक- यांचे उत्पन्न वाढावे रस्त्यासाठी भांडणे होवू नयेत. याला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. अशी प्रतिक्रिया सरपंच शिवकुमार हिप्परगे यांनी दिली.

About The Author

error: Content is protected !!