दरोड्याच्या तयारीतील आरोपीना अटक
पुणे (रफिक शेख) : 03/07/2022 रोजीचे रात्री पेट्रोलिंग दरम्यान Unit-2 कडील HC मोहसीन शेख याना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून हडपसर भाजी मंडई, मागील कॅनॉल रस्ता या निर्मनुष्य ठिकाणावरून रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या पादचारी तसेच मोटरसायकलस्वार याना लुटण्याचे तयारीतील 4 आरोपीतांना Unit-2 कडील टीमने पाठलाग करून ताब्यात घेवून त्यांचे कबज्यातून घातक शस्त्र व इतर साहित्यासह 20,000 ₹ किमतीचे 2 मोबाइल जप्त करून त्यांच्याविरुद्ध हडपसर पो.स्टे. CR No 803/22 IPC 399, 402, आर्म ऍक्ट 4(25) सह मपोअ 37(1) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास Unit-2 प्रभारी व.पो.नि. मा. क्रांतिकुमार पाटील सो. यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली API वैशाली भोसले मॅडम ह्या करीत आहेत.
तपासादरम्यान सदर 2 मोबाईल बाबत आरोपीकडे कसून तपास करता, त्यांनी सदर मोबाइल पालखी उत्सवा दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन चोरल्याची कबुली दिली. सदर मोबाईल बाबत तांत्रिक विश्लेषणाआधारे मालकांचा शोध घेऊन हडपसर पो स्टे CR No 815/22 IPC 379 अन्वये गुन्हा उघडकीस आणला असून दुसरा गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे आशा प्रकारे Unit-2 ने कस्टडी मुदतीत सदर अट्टल आरोपीतांकडून 2 मोबाइल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पुढे अधिक तपास सुरू आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी ही रामनाथ पोकळे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, श्रीनिवास घाडगे पोलीस उपायुक्त गुन्हे, गजानन टोम्पे सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे 1, क्रांतीकुमार पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, Unit-2 यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली API वैशाली भोसले, API विशाल मोहिते, PSI राजेंद्र पाटोळे, PSI नितीन कांबळे, पोलीस अमलदार गणेश थोरात, उत्तम तारू, शंकर नेवसे, समीर पटेल, संजय जाधव, निखिल जाधव, विनोद चव्हाण, विजय पवार, प्रमोद कोकणे, मोहसीन शेख, कादिर शेख, गजानन सोनुने व नागनाथ राख या टीमने केली आहे