पालखी बंदोबस्तात सराईत चोरट्याला अटक

पालखी बंदोबस्तात सराईत चोरट्याला अटक

पुणे (रफिक शेख) :शहरांत संत ज्ञामेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी बंदोबस्ताच्या अनुषंगाने कर्तव्यावर असलेले गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पोलीसांनी साधु वासवानी चौका जवळील रोडवर पालखीत गर्दीचा फायदा घेऊन जबरी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत चोरट्याला पाठलाग करून जेरबंद केले आहे. त्याच्या कडुन एक मोबाईलफोन हस्तगत करत बंडगार्डन पोलीस स्टेशन मधील चोरीचा दाखल गुन्हा उघडीस आणल्याची कामगिरी केली आहे. पालखीत गर्दीचा फायदा घेऊन महागडा मोबाईल फोनची चोरी करणारा प्रेमराज राजेश पट्टपु (वय 22. रा. शिंदेवाडी हडपसर ) असे अटक करण्यात आलेल्या सराईत चोरटयाचे नाव आहे. पुणे शहरात संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळ्याचे पुणे पोलीसांनकडुन मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त करण्यात आला.त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनचे मा. पोलीस निरीक्षक श्री. क्रांतीकुमार पाटील व मा. पोलीस उपनिरीक्षक श्री. नितीन कांबळे हे पोलीस स्टाफसह दि .22 जून रोजी कार्यक्षेत्रातील ससुन हॉस्पीटल समोरील रोडवर पेट्रोलिंग करीत असताना. पालखीच्या गर्दीमध्ये एक इसम संशयीत फिरत असल्याचे पोलीस अंमलदार समीर पटेल व कादीर शेख यांना दिसुन आले. तात्काळ मा.वरिष्ठांच्या सुचनेनुसार गुन्हे शाखेच्या पोलीसांनी रेकॉर्डवरील चोरटा प्रेमराज याला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ एक मोबाईल फोन मिळुन आला.त्या मोबाईल फोन बाबत त्याच्याकडे विचारणा केली असता हा मोबाईल फोन त्याचा साथीदार दीपक ऊर्फ दिप्या ( रा. देहुरोड )याचा मदतीने साधु वासवानी चौकाजवळील वुडलैंड हॉटेल येथे मोबाईल हिसकावल्याची कबुली दिली. हि कामगिरी पुणे शहराचे मा.पोलीस आयुक्त गुन्हें रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपा युक्त गुन्हें निवास घाडगे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हें टॉम्पे. पुणे शहर गुन्हें शाखा युनिट 2 चे मा. पोलीस निरीक्षक श्री. क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उपनिरीक्षक श्री. नितीन कांबळे. पोलीस अंमलदार शंकर नेवसे. समिर पटेल. कादीर शेख. गजानन सोनवणे. निखिल जाधव. साधना ताम्हाणे. नागनाथ राख यांनी केली आहे.

About The Author

error: Content is protected !!