बिबवेवाडी पोलीसांची धडाकेबाज कारवाई; ६० तोळे दागिने जप्त

पुणे (रफिक शेख) : विबवेवाडी पोलीसांनी उच्चभू सोसायटीत दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत अट्टल गुन्हेगाराना जेरबंद केले. वरिष्ठ पोलीस निरिक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी कौशल्यपूर्ण तपासात आरोपींनी चोरून लपविलेले ६० तोळे वजनाचे रुपये ३० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत याबाबत पोलीस पुढील तपास करत आहे. बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे हद्दीत २०/०६/२०२२ रोजी सायंकाळी ०४.०० वा. ते ०७.०० वा. चे दरम्यान सोबा सवेरा अपाटमेंन्ट. बिबवेवाडी. पुणे. येथील फिर्यादी यांचे राहते घर कुलुप बंद असताना चोरट्याने फिर्यादी यांचे बिल्डीग मधील टेरेसचे लॉक तोडुन टेरेस वाटे फिर्यादीचे घराचे गॅलरीला असलेल्या लोखंडी ग्रील तोडून व वाकवुन घरात प्रवेश करून बेडरूम मधील कबर्ड मध्ये असलेले एकुण ६० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १.४०.०००/- असे ऐकुण १८.७६.५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाले नंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस स्टेशन तपास पथक अधिकारी सपोनि काळुखे व पथक यांनी तपास सुरु करून घटनास्थळावरील सीसी टीव्ही फुटेज तपासले.
बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरुन फिंगर प्रिंन्ट विभागा ची मदत घेवुन त्यावर दाखल गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत अट्टल दिवसा घरफोडी करणारा गुन्हेगार १) मुश्तफा शकील अन्सारी ( रा.ग्रिनपार्क कोंढवा पुणे ) याने केल्याची माहीती प्राप्त झाली. त्यावरून बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी प्रविण काळुखे व अंमलदार यांची टिम व गुन्हे शाखा असे समांतर तपास करीत असताना नमुद आरोपी कडील गुन्ह्यातील दाखिने लपविण्यासाठी आरोपी २) जुनेद रिझवान सैफ ( वय २९. रा. ग्रीनपार्क सर्व्हे नं. ४२ शेरखान चाळ. कोंढवा पुणे ३) हैदर कल्लू शेख ( वय ३१ वर्ष धंदा नोकरी रा. वसवाडी. राजे शिवाजीनगर. पाखर सांगवी बार्शी रोड ता. जि. लातुर ) यांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले.
बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण करून कोंढवा व लातुर येथून त्यांना ताब्यात घेतले. तसेच आरोपी मुश्ताक शकील अन्सारी यास गुन्हे शाखा युनिट ०१ पुणे शहर यांनी ताब्यात घेवून बिबवेवाडी पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले. तिन्ही आरोपींन कडे तपासी अधिकारी सपोनि प्रविण काळुखे स्टाफ यांनी सखोल व कौशल्यपूर्ण तपास करून त्यांचे कडुन दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेले ३०.००.०००/- तीस लाख रुपये किमतीचे ६० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करून गुन्हा उघडीस आणलेला आहे.
सदर कारवाई ही अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर पोलीस उप आयुक्त श्रीमती नम्रता पाटील, परिमंडळ ५ पुणे शहर व सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरिक्षक विलास सोंडे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा, पोलीस निरिक्षक प्रविण काळुखे, पोलीस अंमलदार संतोष जाधव, सतिश मोरे, श्रीकांत कुलकर्णी, अतुल महांगडे, शिवाजी येवले, तानाजी सागर व राहुल शेलार यांनी केली आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहा, पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे हे करीत आहे.